लासलगाव प्रतिनिधी
लासलगाव शहरात शनिवारी एकाच रात्रीतून दोन अज्ञात चोरट्यांनी सहा दुकाने फोडत अंदाजे चाळीस ते पंचेचाळीस हजारांचा ऐवज लंपास केला आहे.या घटनांमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी व्यापाऱ्यांनी व नागरिकांनी केली आहे
या बाबत मिळालेल्या माहितनुसार शनिवारी मध्यरात्री
लासलगाव येथे दोन चोरट्यांनी तब्बल एक ते दीड तास धुमाकूळ घातला.या दोन चोरट्यांनी अगोदर मोटर सायकल चोरी केली त्यानंतर शहरातील विनीता गिफ्ट हाऊस,निलेश ट्रेडर्स,राल्को टायर्स,सदगुरु ट्रेडर्स,सुमित ट्रेडर्स,सिध्दार्थ जनरल स्टोअर्स अश्या सहा दुकानाचे शटर तोडून अंदाजे चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपयांची रक्कम चोरल्याची घटना दोन दुकानांमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.
मध्यरात्री च्या सुमारास घडलेल्या या चोरीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.पहाटे स्थानिक नागरिक कोटमगाव रोड व रेल्वे स्टेशन रोडवर फिरण्यासाठी जात असताना दुकानाचे शटर अर्धवट उघडे असल्याची माहिती प्रकाश छाजेड आणि संजय धाडीवाल यांना दिली त्यांनी तातडीने दुकानात येऊन पाहिले असता चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्यांनी सीसीटीव्ही तपासले त्यात दोन चोर चोरी करताना स्पष्ट दिसून आले आहे.लासलगाव पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येत पाहणी केली.सीसीटीव्ही फुटेज वरून लासलगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पो उ नि अजिनाथ कोठूळे व पोलीस कर्मचारी या चोरट्यांचा शोध घेत आहे