लासलगाव; प्रतिनिधी
लासलगाव शहरात मालवाहतूक ट्रक मधून वारंवार डीजल चोरी होण्याच्या घटना वाढल्यामुळे ट्रक मालक व चालक त्रस्त झाले आहे या डिझेल चोरांचा तातडीने बंदोबस्त करून त्यांच्यावर कारवाई करावी या मागणीचे लेखी निवेदन लासलगाव पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अशोक मोकळ यांना लासलगाव मोटार मालक व चालक संघटनेच्या वतीने देण्यात आले.
लासलगाव आशिया खंडातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ असल्यामुळे या ठिकाणी देशातील विविध राज्यातून कांद्यासह इतर शेतमालाची वाहतूक करण्यासाठी मालवाहतूक ट्रक येतात.लांब पल्ल्याची वाहतूक असल्यामुळे ट्रक चालक पुरेश्या प्रमाणत डिझेल टँकमध्ये डिझेल चा भरणा करतात,मात्र अनेक वेळा डिझेल चोर या ट्रक्स मधून मोठ्या प्रमाणात डिझेल ची चोरी करतात या मुळे या ट्रक चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे
गेल्या आठवड्यात होळकर पेट्रोलियम या ठिकाणी उभी असलेल्या ट्रक क्रमांक एम एच १५ ए जी ६९१५ गाडी मालक अमोल राजगिरे यांच्या ट्रक मधून रात्री तीन वाजता सुमारास ८० लिटर डिझेल चोरी गेले त्याचप्रमाणे गाडी क्रमांक एम एच २५ ए टी ९०९० गाडी मालक मोहन अंकुश सुडे राहणार लातूर यांच्या ट्रक मधून लासलगाव येथील गुरुद्वारा जवळ आयडीबीआय बँक समोर रात्री दोन वाजेनंतर अज्ञात चोरट्याने डिझेल टँक मधून ३०० लिटर डीझल चोरून नेल्याची माहिती ट्रक मालक व चालक संघटनेच्या वतीने देण्यात आली.
या प्रकरणी लासलगाव पोलिसांनी सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी जे ने करून भविष्यात अश्या घटना घडणार नाही अशी मागणी ट्रक मालक व चालक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.या वेळी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते