उत्तर महाराष्ट्र

लासलगाव येथे डिझेल चोरीचे प्रकार

लासलगाव; प्रतिनिधी

लासलगाव शहरात मालवाहतूक ट्रक मधून वारंवार डीजल चोरी होण्याच्या घटना वाढल्यामुळे ट्रक मालक व चालक त्रस्त झाले आहे या डिझेल चोरांचा तातडीने बंदोबस्त करून त्यांच्यावर कारवाई करावी या मागणीचे लेखी निवेदन लासलगाव पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अशोक मोकळ यांना लासलगाव मोटार मालक व चालक संघटनेच्या वतीने देण्यात आले.

लासलगाव आशिया खंडातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ असल्यामुळे या ठिकाणी देशातील विविध राज्यातून कांद्यासह इतर शेतमालाची वाहतूक करण्यासाठी मालवाहतूक ट्रक येतात.लांब पल्ल्याची वाहतूक असल्यामुळे ट्रक चालक पुरेश्या प्रमाणत डिझेल टँकमध्ये डिझेल चा भरणा करतात,मात्र अनेक वेळा डिझेल चोर या ट्रक्स मधून मोठ्या प्रमाणात डिझेल ची चोरी करतात या मुळे या ट्रक चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे

गेल्या आठवड्यात होळकर पेट्रोलियम या ठिकाणी उभी असलेल्या ट्रक क्रमांक एम एच १५ ए जी ६९१५ गाडी मालक अमोल राजगिरे यांच्या ट्रक मधून रात्री तीन वाजता सुमारास ८० लिटर डिझेल चोरी गेले त्याचप्रमाणे गाडी क्रमांक एम एच २५ ए टी ९०९० गाडी मालक मोहन अंकुश सुडे राहणार लातूर यांच्या ट्रक मधून लासलगाव येथील गुरुद्वारा जवळ आयडीबीआय बँक समोर रात्री दोन वाजेनंतर अज्ञात चोरट्याने डिझेल टँक मधून ३०० लिटर डीझल चोरून नेल्याची माहिती ट्रक मालक व चालक संघटनेच्या वतीने देण्यात आली.

या प्रकरणी लासलगाव पोलिसांनी सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी जे ने करून भविष्यात अश्या घटना घडणार नाही अशी मागणी ट्रक मालक व चालक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.या वेळी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते

Bhagwat Udavant

Recent Posts

मनमाड-इंदूर रेल्वेमार्गासाठी भूसंपादनाला गती

मालेगाव, नांदगाव तालुक्यांतील 21 गावांतील शेतकर्‍यांना नोटिसा मालेगाव : नीलेश शिंपी गेली अनेक वर्षे प्रतीक्षेत…

4 hours ago

जातो माघारी पंढरीनाथा…

महाराष्ट्रातूनच नाही, तर जगभरातून साधारण महिन्यापासून विठुरायाचा वारकरी आषाढी वारीच्या निमित्ताने पायी वारीत निघाला होता.…

4 hours ago

जिल्ह्यात सलग तिसर्‍या दिवशी जोर‘धार’; धरणांतून विसर्ग

नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात सुरू असणार्‍या जोरदार पावसामुळे गोदावरी नदीला पुन्हा पूर आला आहे. जूनमध्ये…

4 hours ago

सरदवाडी धरण ओव्हरफ्लो; भोजापूरच्या पूरचार्‍यांना सोडले पाणी

आठपैकी पाच धरणे भरली, पावसाची संततधार सुरू सिन्नर : प्रतिनिधी गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या…

4 hours ago

किचन ट्रॉलीच्या कंपनीला भीषण आग

सिडको : विशेष प्रतिनिधी अंबड गावानजीक असलेल्या देवकीनंदन गोशाळा ते अंबड गाव दरम्यानच्या मुख्य रस्त्यावर…

4 hours ago

शिक्षक नेते के. के. अहिरे यांचे निधन

शिक्षक नेते के. के. अहिरे यांचे निधन नाशिक: प्रतिनिधी जेष्ठ शिक्षक नेते, लखमापूरच्या कादवा स्कुल…

5 hours ago