लासलगाव येथे ‘नाफेड’मार्फत लाल कांदा खरेदी सुरू
लासलगाव:समीर पठाण
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने नाफेडमार्फत लाल कांदा खरेदीला सुरुवात केली आहे.कांद्याचे दर मोठ्या प्रमाणावर घसरल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.त्यामुळे ‘नाफेड’मार्फत कांदा खरेदीची शेतकऱ्यांकडून सातत्याने मागणी होत होती.
या पार्श्वभूमीवर नाफेडने कांदा खरेदी करण्याची परवानगी ज्या संस्थांना दिली आहे त्यापैकी न्युट्रोव्ही ऍग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनी नाशिक(फेडरेशन)मार्फत कृष्णधारा फार्मर्स प्रोड्युसर कंपनी खडक माळेगाव या संस्थेने लासलगाव येथे लाल कांद्याची खरेदी सुरू केली असून शुक्रवारी खडक माळेगाव येथील कांदा उत्पादक शेतकरी राजेंद्र यशवंत शिंदे यांचा ३५ क्विंटल लाल कांदा ९३१ रु प्रती क्विंटल दराने खरेदी केला असल्याची माहिती न्युट्रोव्ही ऍग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनी चे सीईओ तथा नोडल ऑफिसर विलास आहीरे यांनी दिली.कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याची प्रतवारी करून ४५ ते ५५ एम एम आकारात कांदा विक्रीसाठी आणावा असे आवाहन विलास आहीरे यांनी केले.
सद्यःस्थितीत कांद्याच्या पडलेल्या किमती विचारात घेता ‘नाफेड’मार्फत लाल कांदा खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून नाफेड च्या कांदा खरेदी मुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार असल्याचे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप व पंचायत समितीचे माजी सभापती शिवा सुरासे यांनी या वेळी सांगितले तसेच नाशिक जिल्ह्यात अजून नाफेड चे कांदा खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांचा कांदा प्रतवारी करून विक्रीसाठी आणावा जेणे करून शेतकऱ्यांच्या कांद्याला योग्य तो बाजार भाव मिळण्यास मदत होईल असेही सुवर्णा जगताप यांनी या वेळी सांगितले.या वेळी कृष्णधारा फार्मर्स प्रोड्युसर कंपनी चे चेअरमन चंद्रशेखर शिंदे,संदीप ठोंबरे,रंजना जगताप,संतोष पानगव्हाणे तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते.
वधूचा घागरा बदलून न दिल्याने नियोजित वराने केले असे काही.... शहापूर : साजिद शेख…
मृत्यू नंतरही आदिवासींच्या नशिबी पुन्हा मरण यातनाच मोखाडा: नामदेव ठोंमरे मोखाडा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या…
सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त आज राज्यस्तरीय भव्य अधिवेशन नाशिक प्रतिनिधी सेवा…
नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4…
जिल्ह्यातील नऊ धरणांतून विसर्ग सुरू नाशिक : प्रतिनिधी शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या…
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मनमानी करत अनेक देशांवर जबर आयातशुल्क लादले. विशेषतः चीनवर जबर…