लासलगाव: समीर पठाण
केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लावलेल्या शुल्कामुळे शेतकरी संतप्त झाले होते.लासलगाव सह जिल्ह्यातील बाजार समित्या गेल्या दोन दिवसांपासून बंद होत्या.आज गुरुवारी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा लिलाव आवारावर कांद्याचे लिलाव सकाळी पूर्ववत सुरू झाले मात्र नाफेड लासलगाव येथे प्रत्यक्ष लिलाव प्रक्रियेत सहभागी न झाल्यामुळे तसेच खाजगी व्यापाऱ्यांनी
नाफेडच्या कांदा खरेदी दरापेक्षा कमी बोली पुकरल्यामुळे
लासलगाव बाजार समितीत सकाळच्या सत्रातील लिलाव संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बंद पाडले .
केंद्र सरकार नाफेड मार्फत 2410 प्रतिक्विंटल भावाने 2 लाख मेट्रिक टन इतका कांदा खरेदी करेल अशी घोषणा सरकारने केली.मात्र तरीही खाजगी व्यापारी लिलाव सुरु झाल्यावर 1900 ते 2000 रुपये इतक्याच दराने कांदा खरेदी करत असल्याने शेतकरी संतापले आहे.अजून पर्यंत नाफेड ने लासलगाव येथे कांदा खरेदी सुरू केलेली नाही.नाफेड ने लासलगाव बाजार समितीच्या लिलाव आवारात प्रत्यक्ष सहभागी होऊन कांदा खरेदी करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी या वेळी केली तसेच या वेळी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी केली
शेतकऱ्यांना कांदा खरेदीचा भाव २४१० रुपये मिळणे अपेक्षित होता मात्र प्रत्यक्षात लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लिलाव आवारात ज्यावेळी लिलाव सुरू झाले त्यावेळी खाजगी व्यापाऱ्यांनी १९०० ते २००० रुपये प्रति क्विंटल ची बोली पुकारली त्यामुळे शेतकरी संतापले व कांदा लिलाव बंद पाडले.नाफेड ने लासलगाव बाजार समितीच्या लिलाव प्रक्रियेत सहभागी होऊन प्रत्यक्ष कांदा खरेदी करावा अशी जोरदार मागणी या वेळी शेतकऱ्यांनी केली.
मुलींचा सांभाळ करण्याचा कंटाळा आल्याने आईने उचलले भयानक पाऊल शहापूर : साजिद शेख शहापूर…
मंत्री गिरीश महाजन यांचा एकनाथ खडसे यांना सवाल नाशिक : प्रतिनिधी पुण्यात रेव्ह पार्टीवर पोलिसांनी…
दि. 27 जुलै ते 2 ऑगस्ट 2025 पुरुषोत्तम नाईक मेष : आप्तेष्टांच्या गाठीभेटी या सप्ताहात…
मंत्री गिरीश महाजन : सुनील बागूल, राजवाडे यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश नाशिक ः प्रतिनिधी भारतीय…
दक्षिण भारत, मध्य प्रदेशातील कांद्याच्या आवकेने भाव गडगडण्याची शक्यता लासलगाव : समीर पठाण गेल्या काही…
नाफेडने जाहीर केले नवे कांदा खरेदी दर लासलगाव :- समीर पठाण गेल्या महिन्यापासून नाफेडच्या माध्यमातून…