भुजबळांच्याच मतदारसंघात मंत्र्यांना
घेराव घाला : आमदार नरेंद्र दराडे यांनी केली मागणी
सोमवारी बंदची हाक
लासलगाव:समीर पठाण
जालना येथील मराठा समाजावर झालेल्या हल्याच्या लासलगाव येथे निषेध करण्यात आला.१९७२ पेक्षा ही यंदा दुष्काळ जन्य परिस्थिती असतांना लक्ष विचलित करण्याच्या हेतूने हा हल्ला करण्यात आहे.निषेध व्यक्त करून चालणार नाही तर निर्णय घेण्याची वेळ आहे. भुजबळांच्याच मतदारसंघात मंत्र्यांना घेराव घाला अशी मागणी आमदार नरेंद्र दराडे यांनी केली.
या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ येवला- लासलगाव मतदार संघातील ४६ गावे सोमवारी बंद पाळण्याचे ठरवण्यात आले.शुक्रवारी जालना येथे झालेल्या निंदनीय घटनेमुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली असून सर्व लोकप्रतिनिधींनी पक्षभेद विसरून एकत्र येत या घटनेचा निषेध केला पाहिजे अशी मागणी सरपंच जयदत्त होळकर यांनी केली
मराठा आरक्षणाचा उगम हा येवला-लासलगाव मतदारसंघात असून १६८ आमदार मराठा समाजाचे असून देखील आरक्षण मिळत नाही हे त्यांचे अपयश आहे.आता आमदारांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे.जालना येथे जिल्हा पोलीस अधीक्षक जोशी असून गृहमंत्री ही फडणवीस आहे असा हा निव्वळ योगायोग असू शकत नाही हा षड्यंत्र असल्याची टीका शिवा सुरासे यांनी केली.येवला -लासलगाव मतदार संघांचे आमदार छगन भुजबळ हे मराठा समाजाच्या मागे उभे राहणार नसेल तर त्यांनी दुसऱ्या मतदार संघाचा विचार करावा असा थेट इशारा रामनाथ शेजवळ यांनी दिला.
यावेळी आ.नरेंद्र दराडे,सरपंच जयदत्त होळकर,गुणवंत होळकर,उपसरपंच रामनाथ शेजवळ,सचिन होळकर,उत्तम कदम प्रकश पाटील,रवी होळकर,केशवराव जाधव,प्रवीण कदम,रजाबाबा होळकर,संतोष ब्रम्हेचा,जगदीश पाटील,शिवा सुरासे,संतोष पानगव्हाणे,बाळासाहेब होळकर,रमेश पालवे,अफजल शेख,डॉ विकास चांदर,डॉ सुजित गुंजाळ,डॉ श्रीकांत आवारे,डॉ विलास कांगणे,ललित दरेकर,डॉ अमोल शेजवळ,योगेश पाटील,मंगेश गवळी,विशाल पालवे,महेश होळकर,युनूस तांबोळी,लतिफ तांबोळी,मिरान पठाण,बिस्मिल्ला शहा,राम बोराडे,डॉ मुज्जमिल मणियार,ज्ञानेश्वर इंगळे,रवी घोडे,सागर अहिरे,अर्शद शेख,राहुल पवार,करण वीस्ते,संदीप गायकर आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.
घरात घुसला, अंगावर पेट्रोल टाकून पेटवले अन नंतर केले असे काही... नाशिक: …
काँग्रेस मेळावा नाशिक : प्रतिनिधी वक्फ सुधारणा विधेयक पास करून जमीन ताब्यात घेण्याचा भाजपा…
कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अभोणा उपबाजारात शेतकर्यांंनी गुरूवारी सुमारे 700 ट्रँक्टर मधून 15 हजार…
नाशिक : प्रतिनिधी गेल्या तीन चार महिन्यांपासून हा तिकडे चालला तो तिकडे चालला अशा अफवा…
नाशिक : प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या पाठोपाठ मतदार नोंदणी कार्यक्रम जाहीर केला होता.आगामी स्तानिक स्वराज संस्थेच्या…
नाशिक : प्रतिनिधी वक्फ सुधारणा विधेयक पास करून जमीन ताब्यात घेण्याचा भाजपा सरकारचा प्रयत्न असला…