लासलगाव बाजार समितीतून मंत्री भुजबळांचा केला फोटो गायब

लासलगाव बाजार समितीतून मंत्री भुजबळांचा केला फोटो गायब

लासलगाव: समीर पठाण

राज्यामध्ये मराठा आरक्षणाचे वातावरण तापलेले असताना आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये त्याचे पडसाद दिसून आले.येथेही मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पाहायला मिळत आहे ? ज्यांच्या नेतृत्वाखाली लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक संपन्न झाली असे राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तसेच ओबीसी चे मातब्बर नेते मंत्री छगन भुजबळ यांचा सभापतींच्या मुख्य दालनातील असलेला फोटो गायब झाला असून आता तेथे छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावण्यात आला आहे.

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेल्या तीन पंचवार्षिक निवडणुकीमध्ये भुजबळ यांच्या शब्दाला मान राखला गेला त्यांनी सूचविलेले सभापती-उपसभापती पद निवडीत त्यांच्या शब्दाला मान मिळत असत.मात्र रविवारी सायंकाळी सभापतींच्या मुख्य दालनातील मंत्री भुजबळ यांचा असलेला फोटो काढून त्याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावण्यात आल्याने मराठा विरुद्ध ओबीसीचा संघर्ष दिसून येत आहे.सध्या घडत असलेल्या अनेक घडामोडींमध्ये येणाऱ्या काळात भुजबळांना अजून काय काय पाहावे लागते हे पाहणे औचित्याचे ठरेल.यावेळी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रवीण कदम,शिवसेना शहर अध्यक्ष प्रमोद पाटील,ज्ञानेश्वर इंगळे,सोनू केदारे यांच्यासह मराठा समाजातील तरुण वर्ग उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *