महाराष्ट्र

लासलगाव बाह्य वळण रस्ता नवीन सीमांकनामुळे शेतकरी संतप्त

लासलगाव प्रतिनिधी

लासलगाव बाह्य वळण रस्त्याचे यापुर्वी झालेले सिमांकन (अलाईनमेंट) बदलून नवीन सिमांकनाची प्रक्रीया सुरु झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्याने शेतकरी संतप्त झालेले आहेत.सध्या महाराष्ट्रात अलाईनमेंट बदलाचे पेवच फुटले की काय असा प्रश्न पडला आहे. लासलगावातील रहदारीची समस्या व अपघात टाळण्यासाठी गेल्या सोळा ते सतरा वर्षांपासून उड्डाणपूल व लासलगाव बाह्य वळण रस्त्याचे काम सुरु आहे.आहे.सदर प्रकल्पाच्या भूसंपादनाचे तीन टप्पे करण्यात आले होते.यापैकी दोन टप्प्यांचे भूसंपादन व उड्डाणपूलाचे काम पुर्णत्वास आहे.केवळ एक कि.मी.च्या भूसंपादना अभावी रस्ता तिष्ठत पडलेला आहे.

सध्या तिसऱ्या टप्प्यातील भूसंपादनाची मोजणी,सिमांकन,शोध अहवाल,मुल्यांकन आदी प्रकारच्या सर्व प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत.भूसंपादन करुन रस्त्याच्या कामास सुरुवात करणे एवढेच काम बाकी आहे.असे असतांना भूसंपादन अधिकाऱ्यांनी अचानक युटर्न घेतल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. शेतकऱ्यांनी आजवर कधीही प्रकल्पास विरोध केलेला नाही.अधिकारी व शेतकऱ्यांची अधिकृत बैठकच झालेली नाही.शेतकऱ्यांना दरच माहित नसल्याने मोबदला मान्य नसल्याचा प्रश्नच येत नाही. याच प्रकल्पातील मागील शेतकऱ्यांवर झालेला अन्याय लक्षात घेता पुन्हा तसला प्रकार होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी ना. भुजबळांना साकडे घातले होते.तेव्हा ना.भुजबळांनी शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश दिले होते.सिमांकन बदलण्याचे नाही.तसेच मा.जिल्हाधिकारी प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी आले असता शेतकऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.व न्यायाची मागणी केली असता मा.जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी सकारात्मक चर्चा केली होती.या व्यतीरिक्त शेतकऱ्यांच्या वतीने कधीही तीव्र विरोध झालेला नाही.बरेच शेतकरी खरेदी देण्याच्या मानसिकतेत आहे.उर्वरीत शेतकऱ्यांचे भूसंपादन करण्याचा अधिकार भूसंपादन अधिकाऱ्यांना आहे. तरी देखील हा सिमांकन बदलण्याचा अट्टहास कशासाठी ? सिमांकन बदलले तरी तेथील शेतकरी योग्य दर मागणार नाही का ? तसेच तांत्रिक अडचणी येऊन अपघात वाढणार नाही का ? अवघे एक कि.मी.चे.कामात या अगोदर देखील दोन वेळेस तांत्रिक अडचणीचे कारण देत सिमांकन बदलण्यात आले होते.आता अजून किती वेळेस सिमांकन बदलणार आणि रस्ता अस्तित्वात येणार तरी कधी ? असा प्रश्न शेतकरी व नागरीकांच्या वतीने उपस्थित केला जात आहे.

 

येवला लासलगाव मतदार संघाचे भाग्यविधाते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.छगन भुजबळ हे शेतकऱ्यांचे कैवारी आहेत.साहेबांनी शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते.सिमांकन बदलण्याचे नाही.सिमांकन बदलल्यास लासलगाव बाह्य वळण रस्ता अपघात प्रणव क्षेत्र होईल.त्यामुळे सिमांकन जैसे थे ठेवावे.त्यात कुठलाही बदल करु नये.

जयदत्त होळकर (सरपंच लासलगाव)

 जिल्हाधिकारी यांनी पाहणी केली पण प्रत्यक्ष लाभार्थी शेतकऱ्यांची याबाबत चर्चा केली नाही जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी संमती दर्शवली असताना अधिकारी स्तरावर नवीन सीमांकन का होत आहे हे लक्षात येत नाही.सर्व शेतकरी वर्गाचे संमती पत्रावर यापूर्वी स्वाक्षरी घेतलेली आहे केवळ एकदोन व्यक्तीसाठी यास हरकत आहे. पालक मंत्री नामदार छगन भुजबळ यांनी विश्वासात घेऊन भूसंपादनाची प्रक्रिया राबवण्याचे आदेश दिलेले असतानाही नवीन सिमांकनाचा अट्टहास का ?

ज्ञानेश्वर पाटील (लाभार्थी शेतकरी,लासलगाव)

Bhagwat Udavant

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

3 minutes ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

11 minutes ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

22 minutes ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

27 minutes ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

34 minutes ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

42 minutes ago