भरदिवसा गाडीची काच फोडून साडेतीन लाखांची रोकड लंपास

 

लासलगाव :प्रतिनिधी

लासलगाव येथील कोटमगाव रोड वरील योगेश कृषी सेवा केंद्राजवळ भरदिवसा मोटरसायकलवर आलेल्या
दोन अज्ञात चोरट्यांनी क्रेटा कंपनीच्या गाडीची काच फोडून गाडी मध्ये ठेवलेली साडेतीन लाखांची रोकड लंपास केल्याची घटना गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली.

या बाबत मिळालेल्या माहिती नुसार रुई येथील शेतकरी ज्ञानेश्वर दौलत तासकर यांनी गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास लासलगाव येथील एच.डी.एफ.सी.बॅंक मधून चार लाख रुपये काढून क्रेटा गाडी घेऊन कोटमगाव रोड वरील योगेश कृषी केंद्र मध्ये शेती औषधं घेण्याकरता गेले,त्यांनी क्रेटा गाडी कृषी सेवा केंद्राच्या बाजूला लावून पन्नास हजार रुपये सोबत घेऊन दुकानात गेले.शेती औषधं घेऊन गाडी जवळ आले असता सी सी टी वी कॅमेरात कैद तोंडाला मास्क लावलेल्या अज्ञात मोटारसायकलस्वाराने क्रेटा गाडीच्या ड्रायव्हर सीट शेजारील काच फोडून गाडीच्या डॅश बोर्डच्या ड्रावर मध्ये कापडी पिशवीत ठेवलेले साडे तीन लाख रुपये लंपास केल्‍याचे तासकर यांना निदर्शनास आले.

या बाबत ज्ञानेश्वर तासकर यांनी तातडीने लासलगाव पोलिसांशी संपर्क साधत सदर घटनेची माहिती कळविली याप्रकरणी लासलगाव पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स पो नि राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *