नाशिक

निओ मेट्रोचे दिल्लीत सादरीकरण

 

 

नाशिकरांच्या नजरा अंतिम निर्णयाकडे

 

नाशिक : प्रतिनिधी

 

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक नाशिकची भेट व विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विभागीय आयुक्तालयातील बैठकीत देशातील पहिली टायरबेस मेट्रो निओ नाशिकला दिली होती. मात्र गेल्या तीन वर्षांपासून नाशिककर वाटच पाहात होते. अखेर नियो मेट्रोला गती मिळण्याचे चित्र समोर आले आहे. पालिका आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांनी बुधवारी (दि.15) दिल्लीत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थित नियो मेट्रोचे सादरीकरण केले.

नाशिक मध्ये नुकतेच झालेल्या भाजपच्या राज्य अधिवेशनात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत लवकरच नियो मेट्रोचे सादरीकरण केले जाणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर पाच दिवसांतच दिल्लीत बुधवारी बैठक बोलावली आहे. या बैठकीला नाशिकपालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार पाचारण झाले. आयुक्त यांच्या उपस्थित झालेल्या सादरीकरणामुळे नाशिककरांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

संपूर्ण देशात महत्त्वाच्या शहरांमध्ये टायरबेस मेट्रो प्रकल्प होईल. त्यावेळी नाशिक मध्ये मेट्रोचे काम सुरु होईल. दोन ते तीन महिन्यांमध्ये मेट्रोच्या कामाला सुरवात होईल. असे आश्वासन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले होते. त्यानंतर आता लगेचच दिल्लीत या संदर्भात महत्वाची बैठक पार पडली.. या सादरीकरणासाठी मेट्रो प्राधीकरणाबरोबरच पालिका आयुक्तांनाही बोलवले आहे.

या प्रकल्पासाठी महारेल आणि सिडकोच्या माध्यमातून सर्वेक्षण करून मेट्रो निओची दोन टप्प्यांतील मार्गिका, स्थानके, शेडसाठीची जागाही निश्चित करण्यात आली होती. २०२० च्या केंद्रीय अर्थसंकल्पात मेट्रोसाठी २०२४ कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली होती. त्यानंतर हा प्रकल्प केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीच्या पटलावर असल्याचे कारण देत फक्त हिरवा झेंडा दाखवणेच बाकी असल्याचे सांगितले जात होते. केंद्रातील मंत्रीही नाशकात येऊन यासंदर्भात निओ मेट्रो लवकरच होईल, असे सांगत होते. मात्र, प्रकल्प कधी सुरू होणार, हे स्पष्ट होत नव्हते. अखेरीस, फडणवीस यांनीच शनिवारी (दि.११) भाजप प्रदेश कार्यकारिणी बैठकीत देशासाठी एकसमान मेट्रोचे मॉड्युल लागू होणार असल्याचे जाहीर केले होते.

प्रकल्प सुंदर असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवडला. त्यावरून देशामध्ये दोनच प्रकारच्या मेट्रो असल्या पाहिजे. त्यात टायरबेस मेट्रो हा दुसरा प्रकार आहे. देशात सगळीकडे याच प्रकारे असे प्रकल्प लागू करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. त्यामुळे मेक इन इंडिया अंतर्गत मेट्रो प्रकल्प तयार केला जाणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले होते, सादरीकरण केल्यानंतर त्यावर काय अंतिम निर्णय येतो याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

 

 

 

 

अशा पद्धतीने असेल तयारी

 

या टायरबेस मेट्रोसाठी एकूण २९ स्टेशन असणार आहे. याशिवाय दोन फिडर कॉरिडोर असतील. त्यापैकी एक सातपूर कॉलनी, गरवारे, मुंबई नाका दरम्यान चालेल तर दुसरा नाशिकरोड, नांदूरनाका, शिवाजीनगर दरम्यान चालेल. मेट्रो निओसाठी सुरूवातीला दोन एलिव्हेटेड कॉरिडोर उभारले जाणार आहेत. पहिला एलिव्हेटेड कॉरिडोर १० कि.मी. लांबीचा असून त्यात गंगापूर, जलालपूर, गणपतनगर, काळेनगर, जेहान सर्कल, थतेनगर, शिवाजी नगर, पंचवटी, सीबीएस, मुंबई नाका अशी दहा स्थानकं असतील. दुसरा कॉरिडोर गंगापूर ते नाशिकरोड असा २२ कि.मी. लांबीचा असून त्यात गंगापूर गाव, शिवाजी नगर, श्रमिक नगर, एमआयडीसी, मायको सर्कल, सीबीएस, सारडा कॉर्नर, द्वारका, गांधी नगर, नेहरू नगर, दत्त मंदिर, नाशिक रोड अशी स्थानकं असतील. सीबीएस कॉमन स्टेशन असेल.

Ashvini Pande

Recent Posts

साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज

गाडीत पैसे असल्याच्या संशयावरून राडा साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज नांदगांव /…

2 days ago

जुने नाशिक भागात आमदार फरांदे यांनी साधला सवांद

नाशिक : प्रतिनिधी नाशिक मध्यचे दोन्ही उमेदवार देवयानी फरांदे आणि वसंत गीते एकाच वेळी  आल्याने…

2 days ago

नांदगावमध्ये सुहास कांदे आणि समीर भुजबळांमध्ये राडा

नांदगाव: येथील मतदार संघात आज समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात आज पुन्हा राडा झाला.…

2 days ago

यांनी बजावला मतदानाचा हक्क

नाशिक: लोकशाहीचा उत्सव असलेल्या मतदानास सकाळी 7 वाजेपासून सुरुवात झाली आहे, मतदानाचा हक्क बजावत अनेकांनी…

2 days ago

जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान

  जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान नाशिक मध्य मध्ये दोन तासात सर्वाधिक…

2 days ago

बनकर, कदम यांनी बजावला मतदानाचा हक्क

निफाड:- प्रतिनिधी निफाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उ बा ठा चे उमेदवार माजी आमदार अनिल कदम…

2 days ago