लेक होईना लाडकी, नऊ महिन्यांत अवघे सात प्रस्ताव

लेक होईना लाडकी, नऊ महिन्यांत अवघे सात प्रस्ताव

‘माझी कन्या भाग्यश्री’चे नवीन 25 प्रस्ताव प्राप्त

नाशिक ः देवयानी सोनार
मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना भरीव मदत व्हावी, या उदात्त हेतूने शासनाने माझी कन्या भाग्यश्री या योजनेत सुधारणा करून नवीन लेक लाडकी योजना सुरू केली आहे. एप्रिलपासून ही योजना सुरू झाली असली तरी नऊ महिन्यांत आतापर्यंत अवघे 7 प्रस्ताव प्राप्त झाले असून, अजून प्रस्ताव येण्याची शक्यता असल्याने मार्च 2024 पर्यत लेक लाडकी योजनेचा निधी वितरित केला जाणार आहे.
माझी कन्या भाग्यश्री 2022-23 – 2023-24 काळात 157 प्रस्ताव मंजूर झाले आहेत. नवीन 2023-24 मध्ये 25 नवीन प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. सन 2022 – 23 मध्ये माझी कन्या भाग्यश्री योजनेचे 40 प्रस्ताव आले होते. यासाठी 10 लाख रुपये इतका निधी प्राप्त झाला होता.
2023-24 ला 157 प्रस्ताव आले यासाठी 56 लाख इतका निधी प्राप्त झाला होता. त्यापैकी 30 लाख रुपयांचा खर्च करण्यात आला.2023-24 मध्ये 25 प्रस्ताव प्राप्त झाले असून, उर्वरित शिल्लक रकमेतून खर्च करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे जिल्हा परिषदेच्या महिला बाल कल्याण विभागाकडून सांगण्यात आले आहे.
केंद्र शासन, राज्य शासन व स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना आखल्या जातात. महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या महाराष्ट्र लेक लाडकी योजनेंंतर्गत गरीब आणि आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबातील मुलींना महाराष्ट्र शासनाकडून एक लाख एक हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते. ही योजना महाराष्ट्रातील सर्व गरीब मुलींसाठी वरदान ठरणार आहे. मात्र, या योजनेच्या प्रचार आणि प्रसारात शासकीय यंत्रणा कमी पडत आहे. लोकांपर्यंत ही योजना पोहोचविण्याबरोबरच नागरिकांची उदासीनता अथवा किचकट अटींमुळे ही योजना अजूनही बाळसे धरण्यास तयार नाही. एप्रिल महिन्यात या योजनेला प्रारंभ झाला असून, डिसेंबरपर्यंत अवघे सात प्रस्ताव प्राप्त झाल्याचे शासकीय आकडेवारीवरून स्पष्ट होते.  वंशाला दिवा म्हणून मुलगाच हवा, ही मानसिकता समाजातून नष्ट होण्याच्या उदात्त हेतूने लेक लाडकी योजना सुरू करण्यात आली.

महाराष्ट्र लेक लाडकी योजनेची घोषणा 2023 च्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. ज्या अंतर्गत गरीब पात्र मुलींना 18 वर्षे पूर्ण झाल्यावर  75 हजारांची रोख रक्कम दिली जाणार होती. ही योजना मध्यमवर्गीय व गरीब कुटुंबातील मुलींसाठी आहे. त्यामुळे ज्या कुटुंबांकडे पिवळे आणि केशरी रंगाच्या शिधापत्रिका आहेत त्यांनाच या योजनेचा संपूर्ण लाभ घेता येणार आहे.

लेक लाडकी योजनेची उद्दिष्टे
आर्थिक दुर्बल मुलींना बळकट करणे.
गरीब कुटुंबातील मुलींना शिक्षण देणे.
महाराष्ट्रातील अशिक्षित मुलींना शिक्षण देऊन रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देणे.
मुलींच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी.
महाराष्ट्रातील गरीब कुटुंबातील मुलींना चांगले व दर्जेदार शिक्षण देणे.
लेक लाडकी योजनेतून ार्थिक मदत मिळून मुली स्वावलंबी होतील.
मुलींना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य दिशा निवडता येईल.
लेक लाडकी योजनेंतर्गत महाराष्ट्रातील सर्व गरीब मुलींना शिक्षणाची सुवर्णसंधी मिळणार आहे.
चांगले शिक्षण मिळाल्याने गरीब मुलींनाही रोजगाराच्या नवीन संधी मिळणार आहेत.
या योजनेंतर्गत गरीब कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर 5000 दिले जातील.
जेव्हा मुलगी पहिली वर्गात प्रवेश घेते तेव्हा तिला 6000 ची रक्कम दिली जाईल.
जेव्हा मुलगी सहाव्या वर्गात प्रवेश घेते तेव्हा तिला 7000 रुपये मिळतील.
जेव्हा मुलगी 11वीमध्ये प्रवेश घेते तेव्हा तिला 8000 दिले जातील.
शेवटी, जेव्हा लाभार्थी मुलीचे वय 18 वर्षे होईल, तेव्हा तिला पुढील अभ्यासासाठी 75000 ची एकरकमी रोख रक्कम दिली जाईल.

लेक लाडकी योजना नियम
लेक लाडकी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी मुलगी ही मूळची महाराष्ट्राची असावी.
पिवळ्या किंवा केशरी रंगाचे शिधापत्रिका असलेले कुटुंब लेक लाडकी योजनेसाठी पात्र असेल.
महाराष्ट्रातील गरीब व मागासवर्गीय असावा.
उमेदवार कोणत्याही प्रकारच्या कराच्या कक्षेत येऊ नये आणि त्याने कोणताही कर भरू नये.
उमेदवाराकडे कार, ट्रॅक्टर किंवा मोठे घर इत्यादी कोणत्याही प्रकारचे चारचाकी वाहन नसावे.
अर्जदार कोणत्याही सरकारी खात्यात किंवा कोणत्याही सरकारी कार्यालयात कार्यरत नसावा.
लेक लाडकी योजनेसाठी अर्ज करणार्‍या कुटुंबाचे उत्पन्न 1 लाखांपेक्षा जास्त नसावे.
दुसर्‍या आपत्यांनंतर आई किंवा वडील दोघांपैकी एकाने कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करणे बंधनकारक राहील.

ही  कागदपत्रे आवश्यक
पिवळ्या किंवा केशरी रंगाची शिधापत्रिका  मुलीच्या पालकांचे आधार कार्ड  पालकांसह मुलीचा फोटो  अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो  पत्त्याचा पुरावा   उत्पन्न प्रमाणपत्र  मोबाइल नंबर  जीमेल आयडी  बँक पासबुक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *