कसबे सुकेणे येथील तिडके वस्तीवर जेरबंद झाला बिबट्या कसबेसुकेणे: येथील दशरथ पोपट तिडके यांच्या शेत वस्तीवर काल
पहाटे ४ वाजेच्या सुमारास वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात भक्ष्याच्या शोधात असलेला मादी बिबट्या जेरबंद झाला आहे- त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी या मादी बिबट्याचे पिल्ले असण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे-
कसबे सुकेणे आणि परिसरात सातत्याने बिबटे आढळत असून बिबट्याची मोठी दहशत या शिवारात आहे- त्यामुळे नागरिकांच्या मागणीनुसार निफाड वनविभागाने येवला विभागाचे वन संरक्षक निलेश आखाडे , सहाय्यक वनसंरक्षक सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल भगवान जाधव आणि आधुनिक बचाव पथक यांनी सुकेणे परिसरात ठिकठिकाणी पिंजरे लावले आहे – दरम्यान काल दि २० सकाळी ६ वाजता सकाळी शेतकरी शेतकामासाठी गेले असता त्यांना बिबट्याच्या डरकाळीचा आवाज आला , त्यांनी तात्काळ ही माहिती जवळचे शेतकरी आणि निफाड वनविभागाला दिली.