नाशिकरोड : प्रतिनिधी
गेल्या अनेक दिवसांपासून वडनेर गेट, वडनेर दुमाला, पिंपळगाव खांब या भागात धुमाकूळ घालणारा बिबट्या वन विभागाच्या जाळ्यात अखेर अडकला. या बिबट्याला इंजेक्शन देऊन बेशुद्ध करण्यात आले. यामुळे थोडासा का होईना दिलासा नागरिकांना मिळाला आहे. वडनेर गेट, वडनेर दुमाला, पिंपळगाव खांब परिसरात असंख्य बिबटे असून, ते रात्रीच्या वेळी बाहेर निघतात.
नागरिकांवर हल्ले करतात. त्याचप्रमाणे गेल्या दोन महिन्यांत बिबट्याने या परिसरातील वडनेर दुमाला, वडनेर गेट या भागातील दोन बालकांवर हल्ला करून त्यांना ठार केले होते. परिणामी या घटनेनंतर माजी नगरसेवक केशव पोरजे तसेच योगेश गाडेकर, उत्तम कोठुळे, भैया मनियार, सागर निकाळे यांच्या नेतृत्वाखाली वन विभागाच्या कार्यालयात आंदोलन करण्यात आले होते. दरम्यान, त्यानंतर वन विभागाने वडनेर दुमाला व परिसरात 18 पिंजरे व 15 कॅमेरे लावले होते. दरम्यान, काल वडनेर गेट परिसरात राजपूत कॉलनी येथे बिबट्या वन विभागाच्या कर्मचार्यांना दिसताच त्याला इंजेक्शन देऊन बेशुद्ध करण्यात आले. यामुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे.
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…