नांदगावला विहिरीतील बिबट्याचे रेस्क्यू

विंचूर/निफाड : विशेष प्रतिनिधी
तालुक्यातील नांदगाव येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला रेस्क्यू करण्यात वनविभागाला यश आले आहे. परिसरात अनेक ठिकाणी बिबट्यांचा वावर असून, नांदगावमधील विजय एकनाथ जाधव यांच्या मालकीच्या शेतातील विहिरीमध्ये बुधवारी सकाळी बिबट्या पडल्याचे लक्षात आले.
जाधव यांनी वनविभागाला कळविल्यानंतर वनविभागाचे अधिकारी तातडीने नांदगाव येथे दाखल झाले. विहिरीत पडलेल्या पाचवर्षीय बिबट्यास सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर पिंजर्‍याद्वारे निफाड येथील रोपवाटिकेत आणण्यात आले. बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून त्यास अधिवासात सोडण्यात आले. बिबट्या रेस्क्यूसाठी येवला वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल घुगे, वनपाल जयराम शिरसाट, वनपाल विजय दोंदे, वनविभागाच्या आधुनिक पथकातील भारत माळी, शरद चांदोरे, ज्ञानेश्वर पवार, काशीनाथ माळी, आसिफ पटेल आदींनी परिश्रम घेतले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *