भोसला मिलिटरी स्कूल परिसरात बिबट्याचा शोधमोहीम सुरू; दुपारचे सत्र रद्द
नाशिक : भोसला मिलिटरी स्कूलच्या परिसरात बिबट्या फिरत असल्याची चर्चा असून या संदर्भात माहिती मिळताच वनविभागाच्या वन्यप्राणी बचाव पथकासह गंगापूर पोलीस स्टेशनचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. परिसरात घनदाट झाडी व उंच गवत असल्याने शोधमोहीम आव्हानात्मक ठरत असून ड्रोनच्या साहाय्याने व्यापक तपासणी सुरू आहे.
शाळेच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाशी चर्चा करून दुपारचे सत्र तात्काळ रद्द करण्यात आले आहे. सकाळच्या सत्रातील विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण न येता स्कूल व्हॅनच्या माध्यमातून सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
वनविभागाचे अधिकारी, पोलीस आणि शाळा प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून पुढील घडामोडींबाबत लवकरच अद्ययावत माहिती देण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे.
- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…
- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…
ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…
आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…
पंचवीस वर्षांपासून शेतकर्यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…