कोठुरेसह परिसरात बिबट्याची दहशत

कोठुरे : कोठुरे परिसरात बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील उपसा जलसिंचन सोसायटीचे चेअरमन सुयोग गिते यांच्या घराजवळ 15 मे रोजी रात्री आठच्या सुमारास दोन बिबटे फिरत असल्याचे दिसून आलेे. सध्या शेतकरी वर्गाचे कांदा काढणीचे काम सुरू आहे. मजूर शेतात येण्यास टाळाटाळ करीत आहेत. एकीकडे अवकाळी पावसाचा कहर आणि वारंवार बिबट्याचे दर्शन आदींमुळे शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. कोठुरेे व गोदाकाठ परिसरात बर्‍याच दिवसांपासून बिबट्याचा मुक्तसंचार आहे. कुत्रा, बकरी, वासरे, हे बिबट्याच्या हल्ल्यात बळी पडत असताना, आता मनुष्यावरही बिबट्याचे हल्ले सुरू झाले आहेत. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने तत्काळ पिंजरा लावावा, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *