शिवडी परिसरात बिबट्याची
दहशत
गाभण गिर गायीवर हल्ला
निफाड : प्रतिनिधी
निफाड तालुक्यातील शिवडी परिसरात बिबट्याची दहशत वाढली आहे शुक्रवारी मध्यरात्री शिवडी रेल्वे गेटनजिक राहणारे बाळासाहेब सानप यांची गिर गाय बिबट्याने हल्ला करुन ठार केली आहे त्यामुळे परिसरात घबराट निर्माण झाली आहे
शिवडी माळवाडी भागातही गेल्या पंधरवाड्यात बिबट्याने कुत्रा व वासरु फस्त केले होते याबाबत वन विभागाला कळवुनही दखल घेतली गेली नसल्याचे नागरिकांनी सांगितले शिवडीत गिर गाय ठार करण्यात आल्याने बिबट्याची मोठी दहशत निर्माण झाली आहे परिसरातुन शाळेत जाणारी मुले मुली घाबरली आहे त्यामुळे पालक वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे
शिवडी भागात दोन पिंजरे लावावे अशी मागणी शिवडी सोसायटीचे चेअरमन बाबुराव सानप, माजी उपसरपंच संजय शिंदे ,अण्णासाहेब सोनवणे , अरुण क्षीरसागर ,करण सानप आदींसह ग्रामस्थांनी केली आहे
मुंबई: विधानसभेत रमी खेळत असल्याच्या मुद्द्यावरून जोरदार टीका झाल्यामुळे चर्चेत आलेले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे…
खासदार संजय राऊत यांच्यावर नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नांदगाव आमिन शेख शिवसेना उद्धव बाळासाहेब…
मुलींचा सांभाळ करण्याचा कंटाळा आल्याने आईने उचलले भयानक पाऊल शहापूर : साजिद शेख शहापूर…
मंत्री गिरीश महाजन यांचा एकनाथ खडसे यांना सवाल नाशिक : प्रतिनिधी पुण्यात रेव्ह पार्टीवर पोलिसांनी…
दि. 27 जुलै ते 2 ऑगस्ट 2025 पुरुषोत्तम नाईक मेष : आप्तेष्टांच्या गाठीभेटी या सप्ताहात…
मंत्री गिरीश महाजन : सुनील बागूल, राजवाडे यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश नाशिक ः प्रतिनिधी भारतीय…