बिबट्याचा फेव्हरेट स्पॉट मनमाडचा शीख मळा

बिबट्याचा फेव्हरेट स्पॉट मनमाडचा शीख मळा
बिबट्याच्या दर्शनाने भीतीचे वातावरण…!

मनमाड.  प्रतिनिधी:

चार दिवसांपूर्वीच एक बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले होते तोच एक दिवस गॅप देऊन दुसरा बिबट्या आल्याची चर्चा परवा रात्री होती आणि काल रात्री पुन्हा एकदा बिबट्या मनमाड शहरातील गुरुद्वारा मागील शीख मळ्यात घुसल्याचे अनेक नागरिकांनी बघितले सुरवातीला ही अफवा आहे असेच वाटत होते मात्र अनेकांनी त्याला बघितले आणि काहिणींतर फोटो देखील काढले यामुळे बिबट्याचा फेव्हरेट स्पॉट शीख मळा आहे की काय असेच म्हणण्याची वेळ शहरातील नागरिकांवर आली आहे.रात्री गुरुद्वारा मधील सेवेदार वनविभाग कर्मचारी पोलीस मनमाड शहरातील नागरिक यांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला मात्र बिबट्या कुठेही आढळून आला नाही आता पुन्हा पिंजरा लावून बिबट्या जेरबंद करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.
बिबट्या आला बिबट्या आला ही केवळ अफवा ठरत होती मात्र मागील आठवड्याभरात शहरात दोनदा बिबट्याने दर्शन दिले आहे एक जेरबंद करण्यात आला असूनही दुसरा बिबट्या देखील आता पुन्हा एकदा शीख मळ्यात    आहे याचे अनेक साक्षीदार आहेत त्याला शोधण्यासाठी काल रात्री उशिरापर्यंत प्रयत्न करण्यात आले मात्र बिबट्या काही आढळून आला नाही आता या बिबटयाला पकडण्यासाठी पुन्हा एकदा पिंजरा लावण्यात आला असुन हा बिबटया जेरबंद व्हावा अशी सर्वसामान्य मनमाडकर जनतेची मागी आहे शहरातील आय यु डी पी या भागात हा बिबट्या फिरत असुन यामुळे या परिसरात राहणारे नागरीक भीतीमध्ये आहे या बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करा अशी मागणी आता मनमाड शहरातील नागरिकांकडुन केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *