चारशे रुग्णालयांची फायर आॅडिटकडे पाठ

 

पालिकेकडून पुन्हा मुदतवाढ

नाशिक : प्रतिनिधी

मागील काही वर्षात रुग्णालयांना आग लागून जीवितहानीची घटना घडल्या आहेत. रुग्णांची सुरक्षा बघता अग्निशमन विभागाकडून खासगी रुग्णालयांना फायर ऑडिट करणे बंधनकारक करण्यात आले आहे. महापालिकेने जानेवारी महिन्यात फायर ऑडिटची नोटीस प्रसिध्द केली होती. १५ फेब्रुवारीची अंतिम मुदत देण्यात आली होती. दरम्यान शहरातील ६२९ रुग्णालयांपैकी दोनशे रुग्णालयानी फायर ऑडिट केले आहे. चारशेहुन अधिक रुग्णालयानी याकडे पाठ फिरविल्याचे चित्र असून
या रुग्णालयाना पुन्हा अंतिम पंधरा दिवसांची मुदत वाढ देण्यात आली आहे.

शहरातील अग्निप्रतिबंधक सुरक्षा व्यवस्था सुस्थितीत आहे की नाही, याचा दाखला महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. परंतु, मिळालेल्या माहितीनूसार दोनशेहून अधिक रुग्णालयांनी महापालिकेच्या अग्निशमन विभागाला फायर ऑडिटचा दाखला सादर केला आहे. अग्निशमन विभागाने शहरातील रुग्णालय‍ांना फायर आॅडिटसाठी दिलेली मुदत बुधवारी संपुष्टात आली. यावेळी दोनशेहून अधिक रुग्णालयांनी फायर आॅडिट केले आहे. जे कोणी ऑडिट केले नसेल तर अग्निशमन विभागाकडून लाईट व पाणी कनेक्शन तोडण्याची कारवाई केली जाणार आहे. बहुसंख्य रुग्णालय‍ांचा अहवाल अग्निशमन विभागाला प्राप्त झाला नाही. अनेक रुग्णालय प्रशासनाने मुदत वाढवून देण्याची मागणी केली आहे. ते पाहता अग्निशमन विभागाने पुढिल पंधरा दिवसांची मुदत वाढवून दिली आहे. या मुदतीत रुग्णालयांनी अहवाल सादर केला नाही तर त्यांना कारवाईच्या नोटीसा बजावल्या जातील. त्यानंतर अहवाल सादर न करणार्‍या रुग्णालयांचे नळ व वीज कनेक्शन तोडले जाईल.

 

ज्यांनी अद्याप रुग्णालयाचे आॅडिट केले नसेल त्यांना पुढील पंधरा दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानंतर कारवाई केली जाईल. आतापर्यंत दोनशेहून अधिक रुग्णालयांचे फायर आॅडिट अहवाल प्राप्त झाले आहे. ही संख्या दिलेल्या मुदतीत अधिक वाढणार आहे.

– संजय बैरागी, मुख्य अग्निशमन अधिकारी, मनपा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *