मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : विश्व मराठी संमेलनाचे उद्घाटन
नाशिक : प्रतिनिधी
मराठी भाषेसमोर चॅट जीपीटी या कृत्रिम प्लॅटफॉर्मची आव्हाने असली तरी अभिजात मराठी साहित्याचे यामुळे काही होऊ शकणार नाही. चॅट जीपीटी किंवा कुठल्याही आर्टिफिशियलच्या इंजिनच्या माध्यमातून ज्या साहित्याची निर्मिती होते. ते विचारांची भेसळ करूनच तयार केले जाते. याउलट आजही आमच्या सारस्वतांमध्ये नवीन विचार, नवीन साहित्य, नवसंकल्पना सातत्याने मांडण्याची शक्ती आहे; परंतु आर्टिफिशियलच्या माध्यमातून मराठीचा विकास करून ती सर्वदूर नेण्याबरोबरच घराघरांत कशी नेता येईल याकरिता प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.
नाशिकमध्ये आयोजित चौथ्या विश्व मराठी संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.27) झाले. यावेळी उद्घाटनपर भाषणात ते मराठी साहित्य किती समृद्ध आहे यावर बोलत होते. व्यासपीठावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री उदय सामंत, छगन भुजबळ, गिरीश महाजन, महापौर हिमगौरी आहेर-आडके, खा. राजाभाऊ वाजे, खा. डॉ. शोभा बच्छाव, आ. राहुल ढिकले, आ. देवयानी फरांदे, आ. माणिकराव कोकाटे आदींसह उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की भाषाशुद्धीचे काम स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केले. महापौर, विधानसभा, विधान परिषद यांसारखे जे शब्द आपण वापरतो ते शब्द स्वा. सावरकरांनी दिले. मराठी साहित्याची फार मोठी परंपरा असून, ती नाशिक जिल्ह्याने जोपासली आहे. त्याच नाशिकमध्ये विश्व मराठी संमेलन होत असल्याने आपल्याकरिता अभिमानाची गोष्ट असल्याचे त्यांनी म्हटले. कृत्रिम बुद्धिमत्तेेने (एआय) जगात अनेक आव्हाने व संधी निर्माण केल्या आहेत. त्यात भाषा सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी या माध्यमाचा उपयोग करून घ्यायचा आहे. आपली भाषा सर्वांनी शिकावी असे आपल्याला वाटते. याकरिता प्रत्येक शाळेत मराठी शिकवण्याचा कायदा केला. मात्र त्यात काही तांत्रिक अडचणी आल्या. परंतु आता आर्टिफिशियल इंटेलेजनच्या माध्यमातून लॅब तयार केली जाईल. याद्वारे शाळेतल्या मुलांना संवाद कौशल्याचे धडे दिले जातील. महाराष्ट्रात राहणार्या प्रत्येक व्यक्तीला वाचता, बोलता आले पाहिजे म्हणूनच या नवीन तंत्रज्ञाची मदत घेतली जाईल. आपल्या सर्वांना मराठी असण्याचा अभिमान आहे. त्यामुळेच हा अभिमान साजरी करण्यासाठीच आज विश्व मराठी संमेलन भरवत असल्याचे म्हटले.
पुढच्या वर्षी विदर्भात संमेलन
पुढील वर्षाचे विश्व मराठी संमेलन विदर्भात घेतले जावे याकरिता आपण ना. उदय सामंतांकडे मागणी करत आहोत. तसेच त्यानंतरचे संमेलन विदेशात घेतले जाणार आहे. संमेलनात उपस्थित विदेशातून आलेले मराठी भाषिक हे मराठी भाषेचे ब्रॅड अॅम्बेसेडर असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
Let’s take Marathi to the global level with the help of AI
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…