रात्रभर शर्थीचे प्रयत्न करून दुरुस्ती पूर्ण
नाशिक : प्रतिनिधी
नाशिकरोड येथील जलशुद्धीकरण केंद्रातून जेलरोड परिसरात पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन ही फिल्टर हाऊस स्वातंत्र्यसैनिक विश्रामगृहामागे 600 मी. मी पाईपलाईन लिकेज झाल्याने रविवारी (दि .11) सकाळी जेलरोड च्या विविध भागात पाणी पुरवठा होऊ शकला नाही. दरम्यान या लिकेजची माहिती मिळताच प्रभाग क्रमांक अठरा मधील माजी नगरसेवक तथा माजी प्रभाग सभापती विशाल संगमनेरे यांनी तात्काळ नाशिकरोड येथील पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ माहिती देत लिकेज दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यास सांगितले. दरम्यान पालिका अधिकाऱ्यांनी पाणी पुरवठा सुरळीत करण्याकरितात शनिवारी रात्रभर काम केले. अखेर रविवारी दुपारी हे लिकेज दुरुस्ती करण्यात यश आले.
नाशिकरोड विभागीय कार्यलयतील कनिष्ठ अभियंता अशोक जेऊघाले, पी.के.गांगुर्डे यांनी शर्थीचे प्रयत्न करून लिकेज होणारी पाईपलाईन दुरुस्ती केली. दरम्यान ही पाईपलाईन जुनी झाल्यानेच लिकेज झाल्याचे बोलले जातेय. रविवारी पाईपलाईन लिकेजमुळे जेलरोड मधील जागृती नगर, अयोध्या नगर, पिंपळपट्टी मळा, सदाशिव नगर, राजरजेश्वारी परिसर आदी सह विविध भागात पाणीपुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे नागरिकांना याचा त्रास झाला.पाणी येणार नसेल तर पालिकेकडून तसे सांगण्यात येते. मात्र रविवारी पाणी न आल्याने पाणी का आले नाही अशी विचारणा नागरिक करत होते. अनेक नागरिकांना पाईपलाईन लिकेज झालीय याची माहितीच नव्हती. पालिका अधिकाऱ्यांनी शनिवारी रात्री पासून ते रविवारी दुपार पर्यंत काम सुरुच ठेवले. अखेर रविवारी दुपारी हे लिकेज रोखण्यात यश मिळविले.
यावेळी पालिका अधिकाऱ्यांना माजी नगरसेवक विशाल संगमनेरे यांचे स्वीय सहायक सुनील धोंडगे यांनी सदर ठिकाणी उपस्थित राहून अधिकारी आणि कर्मचाऱ्याना मदत केली. यावेळी मक्तेदार गौरव बाफना, सुपरवायझर
शेखर गीते, मोहन तुंगार, वॉलमन सोमनाथ खुर्दळ आदींनी लिकेज ची यशस्वीपणे दुरुस्ती केली. मोठ्या परिश्रमानंतर लिकेज दुरुस्ती केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले पाहिजे.
नाशिकरोड विभागातील काही पाईपलाईन वर्षानुवर्षे जुन्या आहेत. म्हणून अशा प्रकारे लिकेज होत असतात.
जेलरोड परिसरात याच कारणामुळे हे लिकेज झाले असावे. तसेच प्रेशर मुळे जुन्या पाईपलानावर लोड येऊन लिकेज होते. शनिवार ते रविवारी दुपार पर्यंत पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी रात्रंदिवस काम करून हे लिकेज थांबवण्यात आले.
अशोक जेऊघाले, कनिष्ठ अभियंता, ना. रोड पाणीपुरवठा विभाग
….
नवीन पाईपलाईन टाकण्याची आवश्यकता
नाशिक रोड विभागातील जेलरोड परिसरात पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईन या कित्येक वर्षांच्या आहेत त्यामुळे कधीही या पाईपलाईन लिकेज होण्याची सदैव भीती असते त्यामुळे नाशिक महानगरपालिकेने याकडे लक्ष देऊन तात्काळ नवीन पाईपलाईन बसवण्याची आवश्यकता असल्याची मागणी होत आहे.
नाशिक: प्रतिनिधी ज्येष्ठ खगोल तज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे आज निधन झाले. ते 86 वर्षांचे…
भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष छगन भुजबळांचे दमदार पुनरागमन सिडको: दिलीपराज सोनार ज्येष्ठ नेते छगन भुजबळ…
छगन भुजबळ मंत्रिमंडळात उद्या मुंबईत शपथविधी नाशिक : प्रतिनिधी मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून…
12 राशींचे राशीभविष्य मेष रास मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…
रस्त्याने जाणेही ठरतेय धोकादायक नाशिक : प्रतिनिधी शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महापालिकेचा…
नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत उच्च माध्यमिक प्रथम वर्ष…