लोहणेर सरपंच उपसरपंच यांच्यासह अकरा ग्रामपंचायत सदस्य अपात्र

उमराणे :  वार्ताहर

देवळा तालुक्यातील लोहणेर येथील सरपंच उपसरपंच यांचे सह अकरा ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र करण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई असून या घटनेमुळे देवळा तालुक्यात खळबळ उडाली आहे. मालेगावचे अप्पर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली आहे. या अपात्र झालेल्या सरपंच उपसरपंच यांचेसह अकरा सदस्यांना ग्रामपंचायत कर मागणीसाठीचे बिल वारंवार पाठवून देखील त्यांनी कर न भरल्याने ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम १४ (हा) अन्वये ही अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे. अपात्र करण्यात आलेल्या सदस्यांची नावे खालील प्रमाणे १)रतिलाल बंचीलाल परदेशी सरपंच २)विजया दत्तात्रेय मेतकर उपसरपंच सदस्य – ३) दिलीप म्हाळू भालेराव ४) दीपक काशिनाथ बच्छाव ५) सतीश विश्वासराव सोमवंशी ६) पुनम योगेश पवार ७) उषाबाई गुलाब सोनवणे ८) भाऊसिंग मंगा गायकवाड ९) धोंडू धर्मा अहिरे १०) सविता गणेश शेवाळे ११) रेश्मा रमेश महाजन या सर्व सदस्यांना अपात्र करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *