नवी दिल्ली: संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा उद्या जाहीर करण्यात येणार आहेत, मुख्य निवडणूक आयुक्त उद्या दुपारी3 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे, 2 निवडणूक आयुक्त काल नियुक्त केल्यानंतर निवडणूक कधीही जाहीर होण्याची शक्यता निर्माण झाली होती, त्यानुसार उद्या या तारखा घोषित केल्या जाणार आहेत. सद्या सर्वच पक्ष निवडणूक तयारीला लागले आहेत.भाजप आणि काँग्रेस यांनी काही उमेदवार जाहीर देखील केले आहेत. महाराष्ट्रात अजून जागा वाटप तिढा कायम आहे, कदाचित तारखा जाहीर झाल्यानंतर वेग येणार आहे