सिडको विशेष प्रतिनिधी
सातपूर आयटीआय जवळील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी व आरपीआयचे नेते ,माजी नगरसेवक प्रकाश लोंढे याच्या कारनाम्यांचा साक्षीदार असलेले धम्मतीर्थ कार्यालय महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने जमीनदोस्त केले. कालपासून महापालिकेने पाडकाम सुरू केले होते दरम्यान काल सायंकाळी ही मोहीम सुरु करण्यात आली असली तरी प्रत्यक्ष इमारत पाडकामाला आज सकाळपासूनच सुरुवात झाली
सातपूर आयटीआय सिग्नल जवळ असलेल्या एका बार मध्ये गोळीबार झाल्यावर पोलिसांनी प्रकाश लोंढे याचा मुलगा भूषण लोंढे फरार झाला होता. पोलिसांनी या प्रकरणात प्रकाश लोंढे आणि त्याचा मुलगा दीपक याचा सहआरोपी म्हणून या प्रकरणात गुन्हा दाखल केला. त्यांना पोलिसी खाक्या दाखवत त्यांच्याकडून नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असे वदऊन घेतले. त्यांनतर लोंढे याला घेऊन पोलिसांनी धम्मतिर्थ कार्यालयाची झाडाझडती घेतली, या कार्यालयात एक भुयार देखील सापडले होते. या भुयारात शसरे आणि महागडी दारू सापडली होती।. नंदिनी नदी किनारी असलेल्या या कार्यालयाला महापालिका प्रशासनाने नोटीस बजावून पाच दिवसांत खुलासा करण्याची नोटीस बजावली होती. मात्र पाच दिवसात कोणताच खुलासा न झाल्याने महापालिका प्रशासनाने काल हे कार्यालय पाडण्याची कारवाई सुरू केली.त्यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आज सकाळपासून बुलडोझर च्या साहाय्याने या धम्मतिर्थ कार्यालयावर कारवाई सुरू केली. आज दिवसभर ही कारवाई केली जाणार आहे.हे पाडकाम करतांना मनपाच्या सर्वच विभागातील मनुष्यबळासह जेसीबी,पोकलँन्ड आदी यंत्रसामग्री सज्ज ठेवण्यात आली आहे तसेच याठिकाणी प्रचंड पोलीस बंदोबस्तात तैनात करण्यात आला आहे लोंढे यांचे संपर्क कार्यालय हे नंदीनी नदीवरील पुलानजीक असल्यामुळे या पुलावरुन ये-जा करणा-यांमुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे तसेच या पाडकामावर मनपा आयुक्त मनिषा खत्री यांच्यासह मनपाच्या अतिक्रमण विभागाचे अधिकारी लक्ष ठेवून आहेत