शहापूर : प्रतिनिधी
प्रेयसीच्या प्रेमात बुडालेला एक 32 वर्षीय युवक तिच्यावर वारंवार खर्च करू लागला शेवटी कर्जबाजारी झाला आणि त्याने कर्ज फेडण्यासाठी बाईक चोरीचा मार्ग अवलंबला. गणेश महाडसे असे या संशयित युवकाचे नाव आहे. त्याने 15 बाईक चोरल्या मात्र पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे त्याच्या साथीदारासह या युवकाला अटक केली. प्रेम माणसाला अंध बनवतो. हे सर्वांनीच ऐकलं असेल मात्र हेच प्रेम अट्टल चोरही बनवत असल्याचे उदाहरण ठाण्यात समोर आले . मुरबाड तालुक्यातील दुर्गम भागातील टोकावडे येथील युवक गणेश महाडसे याचे एका तरुणीवर प्रेम होते. प्रेमात अखंड बुडालेल्या गणेशने तिच्यावर प्रचंड पैसे खर्च केले त्यामुळे तो कर्जबाजारी झाला. आता हे कर्ज फेडायचे कसं याचा विचार करत असतानाच त्याने बाईक चोरी करण्यास सुरुवात केली. ठाणे शहर आणि आसपासच्या भागात तो बाईक चोरायचा आणि मुरबाड मधल्या ग्रामीण भागातील नागरिकांना नंबर प्लेट बदलून स्वतः विकायचा. कर्ज फिटले मात्र त्याला पैशाचा हव्यास सुटला आणि तो बाईक चोरी करतच सुटला. इतका की संपूर्ण ठाणे जिल्ह्यात ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी ,बदलापूर अशा ठीकठिकाणी त्याने दुचाकी चोरून त्या ग्रामीण भागात विकल्या . कळवा रुग्णालयातील एका बाईक चोरीचा तपास करताना पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज मध्ये हा तरुण दिसला. त्याचा शोध घेत पोलिसांनी टोकावडे गाठलं आणि या अट्टल बाईक चोराला बेड्या ठोकल्या पोलिसांनी अटक केल्यानंतर अधिक चौकशीमध्ये गणेश महाडसेकडून 15 चोरी दुचाकी जप्त करण्यात आला . त्याच्या साथीदाराला सुद्धा पोलिसांनी अटक केली या प्रकरणी ठाणे न्यायालयाने दोघांनाही चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. घटनेचा अधिक तपास कळवा पोलीस करीत आहे या चोरी केलेला दुचाकी स्वस्तामध्ये विकल्यामुळे ग्राहक देखील मोठ्या प्रमाणात अशा प्रकारच्या दुचाकी घेत होते त्यांना लवकरच पेपर तुमच्या नावावर करून दिले जातील अशी आश्वासन देखील या चोरट्याकडून दिले जायचे म्हणूनच या दुचाकी ची विक्री ही मोठ्या प्रमाणात होत होते त्यातून मिळणाऱ्या रोख रकमेवर मजा मारण्याचे काम हे आरोपी करत होते. यापूर्वी कर्ज फेडण्यासाठी काही युवकांनी वाहन चोरीचा मार्ग पत्करल्याच्या घटना समोर आल्या आहेत
अशोकनगरमध्ये १६ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू, परिसरात खळबळ सिडको/ सातपूर: प्रतिनिधी : सातपूरच्या अशोकनगर परिसरात…
तिघांना अटक; घटना सीसीटीव्हीत कैद मालेगाव : प्रतिनिधी शहरातील जुना आग्रारोडवरील नानावटी पेट्रोलपंपाजवळ एका तरुणाची…
श्यामची आई उत्कृष्ट सिनेमा; शाहरूख खान, राणी मुखर्जीलाही पुरस्कार नवी दिल्ली : भारतातील राष्ट्रीय पुरस्कारांची…
डॉ. नीलम रहाळकर यांचे रविवारी 'अरंगेत्रम्'; वैद्यकीय व्यवसाय सांभाळत जोपासली नृत्यसाधना नाशिक - विशेष प्रतिनिधी…
कळवण येथील भूमिअभिलेखचा लिपिक लाच घेताना रंगेहाथ नाशिक: प्रतिनिधी मोजणी केलेल्या जमिनीचा अहवाल देण्याच्या मोबडल्यात…
मुंबई: विधिमंडळात ऑनलाईन रमी खेळल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेलं कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या खात्यात बदल करण्यात…