सायटिका, कमरेत गॅप, मणक्याची झीज, स्पॉन्डिलाइटिस, स्लिप डिस्क, असे अवघड अवघड शब्द तुम्ही अनेकदा ऐकले असेल किंवा बोलले असाल. आता मला हे वेगळं सांगायला नको की हे शब्द कुठल्या आजाराबाबत बोलले जातात. उत्तर अगदी सोप्पं आहे, की हे सर्व शब्द कंबर दुखीसाठी वापरले जातात. आता नेमके या आजारांत काय प्रॉब्लेम आहे आणि या सर्व शब्दांमध्ये फरक काय आहे किंवा साम्य काय आहे, हे आपण जाणून घेणार आहोत.

सर्वसाधारणपणे वयाच्या चाळिशीनंतर कमरेचे दुखणे डोके वर काढायला सुरुवात करते. कमरेच्या दुखण्यावर सोबत दोन्ही पायांपैकी एका पायात किंवा दोन्ही पायांमध्ये, तळपायापर्यंत किंवा पायाच्या बोटांपर्यंत वेदना होतात. उठायला बसायला सुद्धा त्रास होतो. झोपलं की थोडं बरं वाटतं. परंतु, पुढे वाकणे किंवा वजन उचलणे खूपच कठीण होते. पायांमध्ये मुंग्या येणे, आग होणे, वेदना होणे, पाय जड पडणे, किंवा बधीर पडणे, अशी लक्षणे दिसायला सुरुवात होते. आता हे लक्षण कशामुळे उद्भवतात ते आपण बघू या.

आपल्या पाठीमध्ये एकूण 31 मणके असतात. यातील पहिले 7 मानेचे तर पुढील 12 पाठीचे मणके असतात. नंतरचे 5 हे कमरेचे मणके असतात. माकड हाडाचे 5 आणि त्यापुढील 2 असे एकूण 31 मणके आपल्या शरीरांमध्ये असतात. छोट्या मेंदूच्या पुढील भागाला मज्जारज्जू असे म्हणतात. स्नायूंची हालचाल, स्पर्श, संवेदना, शरीराचा बॅलन्स व स्थिती यासाठीचे संदेश मेंदूकडून शरीराकडे आणि शरीराकडून मेंदूकडे पाठवण्याचा मार्ग म्हणजे मज्जारज्जू. या नाजूक तसेच अतिमहत्त्वाच्या भागाचे संरक्षण होणे गरजेचे असल्यामुळे त्याला माणक्यांचे आवरण असते. मानेपासून तर कमरेपर्यंत आणि खाली माकड हाडापर्यंत अशी रचना असते. यापैकी मानेच्या आणि कमरेच्या मणक्यामध्ये जास्तीत जास्त हालचाल होत असल्याने मानेच्या आणि कमरेच्या मणक्यांचे झिजण्याचे प्रमाण जास्त असते. प्रत्येक दोन मणक्यांच्या मध्ये एक गादी असते, अर्थात डिस्क असते. माणूस दोन पायांवर चालणारा प्राणी असल्याने, शरीराचे सर्व वजन मणक्यावर लादले जाते. त्यामुळे मणके व त्यामधील गादी ही सतत तणावात असते. सततच्या वापरामुळे आणि हालचालीमुळे मणक्यांच्या सांध्यांची झीज व्हायला लागते आणि अशा जीर्ण झालेल्या अवस्थेत पुढे वाकणे, वजन उचलणे, जोर लावणे, अशा कृतीने मणक्यांमधील गादी सरकते. गादी सरकल्याने पाठीमागील मज्जारज्जू आणि सोबतच्या तंतूंंवर दाब पडल्याने तिथे सूज येते व नसांच्या कार्यात अडथळा निर्माण होतो.
मणक्यांच्या सांध्यांची झीज होणे म्हणजेच स्पॉन्डिलाइटिस. फक्त झीज झाल्याने मज्जारज्जू किंवा नसांवर दाब पडेलच असे नाही, परंतु जेव्हा मणक्यांमधील गादी सरकून नसे वर दाब पडतो, तेव्हा ती नस पायामध्ये जिथपर्यंत जाते, त्या भागामध्ये वेदना होऊन मुंग्या येणे, पाय जड पडणे, बधीर पडणे, अशा तक्रारी असतात, त्याला सायटिका म्हणतात. कमरेपासून सुरू होणार्‍या महत्त्वाच्या नसलेला सायटिक नर्व असे म्हणतात आणि म्हणून त्या आजाराला सायटिका असे म्हणतात. मणक्यांमध्ये झीज झाल्यामुळे आणि गादी सरकल्याने दोन मणक्यांच्या मधील अंतर कमी होते.  तसेच मणक्यांच्या सांध्यांची झीज झाल्यामुळे तिथे सूज निर्माण होते. या सर्व बदलांमुळे मज्जारज्जूच्या भोवती दबाव निर्माण होतो. अशावेळी मज्जारज्जूच्या मार्ग आकुंचन पावल्यामुळे कदाचित त्याला गॅप पडला असे म्हणत असावे. मणक्यांमधील गादी अर्थात डिस्क जागेवरून सरकल्याने म्हणजेच, जागेवरून स्लीप झाल्यामुळे त्याला स्लीप डिस्क असे म्हणतात. एकंदर काय तर हे सर्व शब्द एकाच आजाराचे वेगवेगळे वर्णन आहे. आजार होण्याची प्रक्रिया समजून घेणे आवश्यक आहे. मणक्यांची झीज झाल्याने दोन मणक्यांच्या मधील गादी सरकल्याने किंवा मणक्यांमधील सांध्यांची झीज झाल्यामुळे आलेल्या सुजेमुळे, मज्जारज्जूच्या मार्ग आकुंचन पावतो आणि म्हणून मेंदूकडून पायाकडे जाणार्‍या नसांवर दबाव आल्याने पायामध्ये वेदना होतात, मुंग्या येतात, पाय जड पडतो, बधीर पडतो, तसेच पेशंटला पुढे वागण्यात आणि वजन उचलण्यास त्रास होतो. असा हा आजार टाळायचा असल्यास पाठीच्या व कमरेच्या मणक्यात भोवती असलेले स्नायू बळकट करणे, मणक्यांची लवचिकता वाढवणे व आपले वजन आटोक्यात ठेवणे हे प्रतिबंधात्मक उपाय करणे आवश्यक आहे.
डॉ. संजय धुर्जड
अस्थिरोगतज्ज्ञ

Team Gavkari

Recent Posts

सावकार वैभव देवरेच्या  जाचाला कंटाळून ‘ डीएसपी बासुंदी चहा’ फेम व्यावसायिकाची आत्महत्या

सावकार वैभव देवरेच्या  जाचाला कंटाळून डीएसपी बासुंदी चहा' फेम व्यावसायिकाची आत्महत्या सिडको विशेष प्रतिनिधी सावकारीच्या…

2 days ago

चांदवड देवळा मधून डॉक्टर राहुल आहेर, तर नाशिक पश्चिम मधून सीमा हिरे

चांदवड देवळा मधून डॉक्टर राहुल आहेर, तर नाशिक पश्चिम मधून सीमा हिरे नाशिक/ काजी सांगवी…

2 days ago

एकीकडे करपा,दुसरीकडे परतीच्या पावसाचा तडाखा

एकीकडे करपा,दुसरीकडे परतीच्या पावसाचा तडाखा भात शेतीचे  नुकसान, शेतकरी चिंतेत धामणगांव :   सुनील गाढवे पावसाचे माहेरघर…

3 days ago

फार्मसीचे शिक्षण घेणाऱ्या युवतीची इंदिरानगर येथे आत्महत्या.

फार्मसीचे शिक्षण घेणाऱ्या युवतीची इंदिरानगर येथे आत्महत्या इंदिरानगर :  प्रतिनिधी इंदिरानगरमधील साईनाथ नगर चौफुली जवळ…

3 days ago

हरियाणात जिंकले तरी महाराष्ट्रात महायुतीचा पराभव होणारच

हरियाणात जिंकले तरी महाराष्ट्रात महायुतीचा पराभव होणारच खासदार अखिलेश यादव: मालेगावात समाजवादीची सभा मनमाड :…

4 days ago

नाशिक मध्यच्या मतदार यादीत मोठा घोळ

नाशिक मध्यच्या मतदार यादीत मोठा घोळ आ. फरांदे यांचे निवडणूक अधिकार्‍यांना निवेदन नाशिक  ः प्रतिनिधी…

4 days ago