नाशिक

स्थायी समिती सभापतिपदी मच्छिंद्र सानप

बिनविरोध निवड; मनपा तिजोरीच्या चाव्या पुन्हा भाजपच्या हाती

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत ठरल्याप्रमाणे भाजपचे मच्छिंद्र सानप यांची बुधवारी (दि. 25) बिनविरोध निवड झाली. एकमेव स्थायी समिती सदस्य असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे मुकेश शहाणे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. भाजपकडे तब्बल 13 स्थायी समिती सदस्यांचे संख्याबळ होते. राष्ट्रवादी काँग्रेसकडे एकमेव सदस्याचे संख्याबळ असल्याने या सभापतिपदाची निवडप्रक्रिया केवळ औपचारिकताच ठरली होती.

महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात बुधवारी (दि.25) सकाळी अकरा वाजता पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपचे नऊ व शिंदेसेनेचे तीन, मनसेचा एक, असे एकूण 13 स्थायी समिती सदस्य सभागृहात दाखल झाले. शिवसेना उबाठाचे दोन सदस्य तटस्थ राहिले.
निवडणूक कार्यक्रमादरम्यान पीठासीन अधिकार्‍यांनी माघारीकरिता 15 मिनिटांचा वेळ दिला असता, त्यावेळी मुकेश शहाणे यांनी माघार घेतली. जिल्हाधिकारी प्रसाद यांनी मच्छिंद्र सानप यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची सभापतिपदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. यानंतर उपस्थित सदस्यांनी टाळ्या वाजवत सानप यांचे अभिनंदन केले. दरम्यान, याआधी सानप यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केला होता; परंतु भाजपने शिंदेसेनेला सोबत घेतल्याने उपमहापौरपदावरून सानप यांना ऐनवेळी माघार घ्यावी लागली होती. त्यानंतर सानपांची नाराजी दूर करण्यासाठी पक्षाने त्यांची स्थायी समिती सभापतिपदावर वर्णी लावली. सानप यांची निवड झाल्यानंतर महापौर हिमगौरी आहेर-आडके, आमदार प्रा. देवयानी फरांदे, उपमहापौर विलास शिंदे, अ‍ॅड. श्याम बडोदे, अजय बोरस्ते, माजी आमदार बाळासाहेब सानप, भाजप जिल्हाध्यक्ष सुनील केदार, सुधाकर बडगुजर, नीलेश बोरा यांच्यासह नगरसेवकांनी अभिनंदन केले.

पत्रकारांना नो एन्ट्री; महापौर, सभापतींकडून दिलगिरी

स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत प्रशसनाने पत्रकारांना दूर ठेवल्याचे दिसले. पत्रकारांनी सभागृहात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना धक्काबुक्की केली गेली. दरम्यान, झालेल्या प्रकाराबद्दल जिल्हाधिकरी आयुष प्रसाद, महापौर हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी सभापती मच्छिंद्र सानप यांनी दिलगिरी व्यक्त केली. दरम्यान, स्थायी समिती सभापतिपदाची निवडणूक एकतर्फी किंवा बिनविरोध होणार हे निश्चित होते. असे असतानाही प्रशासनाने स्थायी समिती सभागृह पूर्णपणे बंदिस्त केले होते. प्रशासनाचा हा खटाटोप कशासाठी होता? मुळात 16 पैकी 13 स्थायी समिती सदस्य हे भाजप-शिंदेसेनेचे असताना चोख पोलीस बंदोबस्ताबरोबरच दुसर्‍या मजल्यावरील स्थायी समिती सभागृह मंडपाने पूर्ण बंद केले होते. प्रशासनाच्या या भूमिकेवर नगरसेवकांसह राजकीय पदाधिकार्‍यांनी नाराजी व्यक्त केली.

सिंहस्थ व शहर विकासाचे व्हिजन ः सभापती

सिहस्थ कुंभमेळा तोंडावर असून, त्याद़ृष्टीने विकासाची कामे होत आहेत. सिंहस्थ हा आपल्याच प्रभागात म्हणजे पंचवटीत होतो. यापूर्वी चार सिंहस्थ आपण पाहिले असून, त्याद़ृष्टीने विकासाचे नियोजन केले जाईल. त्यामुळे आगामी सिंहस्थात पंचवटीबरोबरच शहरात विकासाची कामे मार्गी लावली जातील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सिंहस्थ
कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली शहराचा विकास साधला जाईल.
– मच्छिंद्र सानप, नवनिर्वाचित सभापती, स्थायी समिती, नाशिक महापालिका

राष्ट्रवादी काँग्रेसचा बिनशर्त पाठिंबा

महापौर निवडणूक झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यावेळी त्यांना काही दिले जाईल, हे निश्चित केलेले नाही. मात्र, राष्ट्रवादीने सभापतिपदासाठी दावा केला. मात्र, स्थायी समितीची निवडणूक तौलनिक बळावर केली जाते. आमच्याकडे 13 सदस्य होते. त्यामुळे मच्छिंद्र सानप हेच सभापती होणार, हे आधीच ठरले होते.
– हिमगौरी आहेर-आडके, महापौर

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

विंचूरसह परिसरातील वाढती गुन्हेगारी चिंताजनक

अवैध व्यवसायांसह खून, लहान-मोठ्या चोर्‍यांची मालिका सुरूच विंचूर : संदीप शिरसाठ विंचूर ऐतिहासिक परंपरा लाभलेले…

4 hours ago

गोंदेश्वर मंदिराच्या दानकर्त्याचे शिल्प प्रकाशझोतात

प्रा. जावेद शेख यांचा संशोधनातून महत्त्वपूर्ण शोध सिन्नर : वार्ताहर ऐतिहासिक व स्थापत्यवैभवासाठी ओळखल्या जाणार्‍या…

4 hours ago

दारू दुकान हटविण्यासाठी महिलांचा रास्ता रोको

अपघाती मृत्यूनंतर चांदवडमध्ये जनक्षोभ चांदवड : वार्ताहर येथील गणूर रोडवरील फुलेनगर भागात मंगळवारी (दि. 24)…

4 hours ago

मनमाडमध्ये स्वच्छतेचा केवळ देखावा; राष्ट्रवादीची टीका

मनमाड : अमिन शेख मनमाड नगरपालिकेचे नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्याकडून सध्या शहरात राबविली जाणारी स्वच्छता…

4 hours ago

मनपा हद्दीत 16 ग्रामपंचायतींच्या कचर्‍याचा बोजा?

व्यवस्था कोलमडणार; महासभेवर लवकरच प्रस्ताव? नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेला आपल्याच कचर्‍याचे वर्गीकरण करण्यात अपयश…

4 hours ago

लक्ष्मी वेंकटेश मंदिर सायखेडा येथे ब्रह्मोत्सवात रंग-भक्तीचा संगम

पालखी सोहळ्याने सायखेडा भक्तिमय नाशिक : प्रतिनिधी सायखेडा येथे बालाजी भगवान संस्था यांच्या प्राचीन परंपरेनुसार…

5 hours ago