गुंडा विरोधी पथकाकडून सातपूरला एकास अटक
सातपूर: प्रतिनिधी
नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णीक, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) नाशिक शहरचे प्रशांत बच्छाव, यांनी मध्यप्रदेश व गुजरात राज्य येथील आगामी लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने त्यांचेकडील फरार असलेल्या आरोपी पकडणे बाबत कोर्टाच्या आदेशाने वॉरंट पाठविले असता अटक वॉरंटमधील संशयित आरोपी पकडण्याबाबत गुंडा विरोधी पथकास आदेशीत केले होते.
त्याअनुषंगानेच जावद पोलीस ठाणे, जिल्हा निमच, राज्य मध्यप्रदेश यांचे कडील केस क्रमांक २६०/२०१० मधील संशयित आरोपी मिलींद सुदामा कांबळे वय-४२ वर्षे रा. सातपूर, नाशिक हा सातपुर परिसरात असल्याची माहिती गुंडा विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार डी. के. पवार व प्रविण चव्हाण यांनी काढली असता सदरची माहिती गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांनी प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त . (गुन्हे) यांना देऊन पथकातील अंमलदार यांनी सातपुर परिसरात सापळा लावुन संशयित आरोपी मिलींद सुदामा काबंळे वय-४२ वर्षे रा. सातपुर नाशिक यास शिताफीने ताब्यात घेतले आहे. कांबळे यास पुढील कारवाईसाठी जावद पोलीस ठाणे, जिल्हा निमच, मध्यप्रदेश यांच्या ताब्यात देण्यासाठी गुंडा विरोधी पथक रवाना झाले आहे. ही कामगिरी गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार डी. के. पवार, प्रविण चव्हाण, मलंग गुंजाळ, सुनिल आडके, राजेश सावकार, विजय सुर्यवंशी, नितीन गौतम, निवृत्ती माळी, गणेश नागरे, प्रदिप ठाकरे, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे, सुवर्णा गायकवाड यांनी संयुक्तरित्या पार पाडली आहे.