नाशिक : प्रतिनिधी
माड सांगवी येथील विवाहितेचा डोक्यात फावडे टाकून खून केल्याची घटना आज मध्यरात्री घडली, आरती विशाल कापसे वय 24 असे या विवाहितेचे नाव आहे. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात लताबाई जाधव यांनी फिर्याद दिली. 16 मे 2016 रोजी माड सांगवी येथील विशाल कापसे यांच्याशी विवाह झाला. पण लग्नाच्या 1 वर्षातच आरतीचा किरकोळ कारणावरून छळ होत होता. असे तक्रारीत म्हटले आहे, 10 दिवसापूर्वीच ती सासरी नंदण्यास आली होती. मात्र काल रात्री किरकोळ कारणावरून वाद झाले होते. पती विशाल याला दारूचे व्यसन होते. असे मुलीचे चुलते कैलास जाधव यांनी सांगितले. याबाबत आडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पती विशाल याने डोक्यात फावडे टाकून आरतीचा खून केला. घटना घडली तेव्हा आरतीचे सासू सासरे घरी नव्हते. मात्र पती विशाल आणि इतर मंडळी घरी होती. कौटुंबिक वाद झाल्याने रागाचा भरात विशालने आरतीच्या डोक्यात फावडे मारले. त्यानंतर तिला जिल्हा रुग्णालयात आणले. मात्र घाव वर्मी लागल्याने तिचा मृत्यू झाला.
नवी दिल्ली: देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन झालं आहे. श्वासोश्वास घेण्यासाठी त्रास…
शिंदे टोलनाक्यावर कारला आग शिंदे:प्रतिनिधी शिंदे टोल नाक्यावर सुमारे साडेसात वाजेच्या दरम्यान सिन्नर कडुन नाशिक…
नाशिक: महापालिका आयुक्त पदाबाबत मोठी घडामोड पहावयास मिळत आहे, वादग्रस्त आयुक्त अशोक करंजकर हे वैधकीय…
दिंडोरीत बनावट नोटा व प्रिंटर जप्त तिघांना अटक दिंडोरी : प्रतिनिधी शहरातील आश्रय लॉज च्या…
नाशिक: प्रतिनिधी महापालिका आयुक्त अशोक करंजकर हे वैधकीय रजेवर गेल्यानंतर त्यांच्या जागी वर्धा येथील जिल्हाधिकारी…
बराजकमल एंटरटेनमेंट'ची दमदार घोषणा महाराष्ट्र भूषण अशोक सराफ आणि वंदना गुप्ते अभिनित नवा मराठी चित्रपट…