जादुगार चिमणी
एका छोट्याश्या खेड्यात कुमुद नावाची मुलगी राहत होती.ती खुप हुशार होती.त्यामुळे घरी ,शाळेत आणि गावात तिच कौतंक व्हायचं.तिच्या घरची परिस्थिती खुप बेताचीच होती.त्यामुळे कधी खायला मिळायच तर कधी मिळायच नाही.कुमुदच्या बडबड्या स्वभावामुळे ती लवकर कोणालाही आपलीशी करायची.छोटीशी कुमुद खुप बोलकी होती आणि छोटीशी होती .म्हणून तिला सगळे जण चिमणी म्हणायचे .
कुमुद शाळेत जायची.शाळेतल्या बाईंनी सर्वाना परीक्षेची फी मागितली.सर्व विद्यार्थ्यांनी फी भरली होती.पण कुमुदकडे फी भरायला पैसैच नव्हते.बाईंनी तिला वर्गात सर्वांसमोर उभ केल आणि म्हणाल्या.कधी फी भरणार कुमुद?तुझं हे नेहमीचेच आहे.फी लवकर भरली नाही तर परीक्षेला बसता येणार नाही.कुमुदनी फक्त मान हालवली.वर्गातले मुल जोरजोरात हसायला लागले.चिऊ… चिमणी…चिऊ चिमणी अस म्हणत तिला चिडवत होते.कुमुदला खुप वाईट वाटल.पण कुमुदला माहित होत घरी पैसे नाहीत.ती रडत घरी गेली.तर आई तिची वाट पाहत होती.आई म्हणाली कुमुद घरात फक्त तांदुळ आहेत.जेवायला खिचडी करते.पण चुलीसाठी लाकड नाहीत.मी जाणार होते.पण माझा पाय मुरगळता तु जाऊन खिचडी पुरते लाकड आण.कुमुद हो म्हणाली .तिने आईचा पाय बघितला खुप सुजला होता.तिला खुप रडायला आल.तिने दप्तर ठेवलं आणि ती लाकड आणण्यासाठी ज॔गलात जात होती. जंगलाच्या वाटेवर गणपतीच मंदीर होत.तिने गणपतीला नमस्कार केला.आणि खुप रडायला लागली.देवा आमचीच परिस्थिती अशी का..?तु कर ना काही तरी .ती रडली आणि रडतच जंगलात शिरली.जंगलात शिरली तशी वार्याची शिळ तिच्या अंगावर आली. ती घाबरत होती.घाबरतच ति लाकड गोळा करत होती.
तिला झाडांच्या पालापाचोळ्याखाली काही तरी चमकत आहे .अस वाटल.ती त्या पालापाचोळ्या जवळ गेली .आणि तिने त्या चमकणार्या काडीला हात लावला.आणि मोठा आवाज झाला.त्या काडीतून एक राक्षस बाहेर आला.तो राक्षस तिला म्हणाला तु का हात लावलास त्या काडीला मी झोपलो होतो ना.
आता मी तुला खाऊन टाकेल.राक्षसाचे अक्राळविक्राळ रूप पाहून कुमुद रडत होती.कुमुद छोटीशी होती. त्याला रडतच तिने सर्व परिस्थिती सांगितली.ती किती गरीब आहे.घरात काही खायला नाही.माझ्या आईला लागल आहे.परिक्षेची फी द्यायची आहे.राक्षसाला ती म्हणाली तु जर मला खाल्लं तर माझी आई काय करेल.कुमुदची सर्व परिस्थिती ऐकून राक्षसाला दया आली.त्याने त्याचे रूप बदलले तो जादुगार होता.तो म्हणाला रडू नको.मी तुला मदत करतो.जादुगाराने कुमुदला कडेवर घेतले आणि म्हणाला काय देऊ तुला कुमुद म्हणाली काही नको.मी फक्त खिचडी साठी लाकड घेऊन जात आहे.तेवढे लाकड नेऊ द्या.जादुगार हसला. तो म्हणाला किती बोलते तु चिमणी सारखी ..नुसता चिवचिवाट. कुमुदही आता हसली तिची भिती नाहीशी झाली होती.ति म्हणाली मला गावातले सगळे जण चिमणीच म्हणतात.जादुगार म्हणाला तर ठिक आहे.तुला मी एक चिमणी देतो.तु त्या चिमणीच्या कानात जी गोष्ट मागशील ती तुला मिळेल.कुमुद खुश झाली.पण तो म्हणाला.तुला मला भेटायला रोज यावं लागेल.तु ज्या दिवशी येणार नाहीस त्या दिवशी चिमणीतली जादू संपेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं एकदा चिमणीने केलेली जादु तशीच राहते.त्यामुळे तो जे मागशिल ते विचार करून माग. कुमुदने मान हालवली व ती आनंदात घरी गेली.
घरी जाऊन तिने चिमणीच्या कानात तिला जे खायचे आहे ते मागितले.सगळ्यांनी मनसोक्त जेवन केले.कित्येक दिवसांनी इतके लज्जतदार जेवन ते गरीब कुटूंब जेवले होते.दुसर्या दिवशी शाळेत जाऊन फी दिली.सगळ तिच्या मना सारख झाल.ती संध्याकाळी जंगलात जाताना गणपतीच्या मंदिरात गेली .आणि गणपतीचे आभार मानले.ती जादुगाराला भेटायला जंगलात गेली.जंगलात तिने त्या चमकणार्या काडीला हात लावला. जादुगार लगेच प्रकट झाला.तिने कालपासून काय काय केले जादुगाराला सांगितले.आणि ती घरी गेली .तिचा हा रोजचा दिनक्रम झाला होता.ती चिमणीच्या मदतीने गावातल्या सगळ्यांना मदत करत होती.गावही तिच्यावर खुश होते.पण तिला आता भिती वाटत होती.चिमणी जर जादुगाराने वापस मागितली तर..तिने ही गोष्ट जादुगाराला बोलावून दाखवली.जादुगार हासला तो म्हणाला नाही मागणार पण ज्या दिवशी तु नाही भेटणार चिमणीतली जादु जाईल. कुमुद रोज संध्याकाळी जंगलात जाते हे गावातल्या लोकांच्या लक्षात येत होते .तसेच कुमुदची गरिबीही कमी झाली हे गावकर्यांच लक्षात आल.त्यामुळे गावातल्या सरपंचानी तिच्यावर आणि तिच्या कुटुंबियांवर पाळत ठेवायला सांगितली. त्यामुळे कुमुद रोज जंगलात जाऊन स्वतःच्याच मनाशी बोलते असे गावातल्या लोकांना वाटले होते.त्यामुळे कुमुदला अनेक जण भूताची बाधा झाली अस म्हणत होते.जादुगाराच्या जादुमुळे तो फक्त त्याला हव्या त्याच व्यक्तीला दिसत होता.कुमुदला भूताची बाधा झाली समजून तिच्या कुटुंबियांना त्रास देत होते.त्यामुळे कुमुद स्वतःवरच नाराज झाली.इतकी हालाखीची परिस्थिती असताना जादुच्या चिमणीमुळे ती व तिच कुटूंब आनंदात जगत होत.
एक दिवस कुमुद शाळेत गेली .तिच्याकडे वर्गातले सर्वजण वेगळ्याच नजरेने बघत होते.सगळ्या मित्र मैत्रिणींना वाटत होत की तीला भूताला झाली आहे.व तिच्या अंगात भूत आहे.तिला कोणी बोलतही नव्हत.ह्या गोष्टीचं तिला खुप वाईट वाटल .आधी गरीबीमुळे हासत होते आणि आता जंगलात जाते म्हणून हासत आहेत.ती मधल्या सुट्टीतच घरी आली.आणि खुप रडली.खुप रडली.तिला लोकांचा खुप राग येत होता.ती रागात चिमणीला म्हणाली गावातली सगळी लोक दगड होऊ दे.ती म्हणाल्याप्रमाणे गावातली सगळी लोक दगड झाली.तिच्या हातात चिमणी होती म्हणून तिला काही झाल नाही.पण तिच्या आईवडिलांसह गावातली सर्वच लोक दगड झाली.ती आई वडिलांकडे बघून रडू लागली.गावात कोणीच जिवंत नव्हत सगळ्यांचे दगडात रूपांतर झाले होते. तिचे मित्र मैत्रिणी आणि गावातले सगळेच लोक दगड होते.ती प्रत्येकाला बघून रडत होती.आईला बोल ना बोल ना म्हण होती.ती चिमणीला परत म्हणाली गावातल्या सर्वाना पुर्वी सारखं जिवंत कर .पण काहीही उपयोग झाला नाही.कारण जादुगाराने दिलेल्या चिमणीची जादुच तशीच होती.एक गोष्ट दिली की परत नाही घ्यायची.कुमुदच्या लक्षात आला जादुगाराने सांगितलेल.एकदा झालेली जादू नष्ट नाही होणार.कुमुदला स्वतःच्या रागाबदल खुप वाईट वाटल.तिला आता स्वतःचाच राग येत होता.पण काहीच उपयोग नव्हता.तिला घडलेल्या प्रसंगामुळे जादुगाराला भेटायला जायचे भानही उरले नव्हते. सुर्य मावळायला थोडाच कालावधी बाकी होता.ति धावपळ करतच जंगलात गेली.पळत पळत गेल्यामुळे तिला दम लागला होता.तिने घाई घाईने चमकणार्या काडीला हात लावला तसा जादुगार बाहेर आला.पण तोही दगड झाला. कारण जादुगारही गावातला होता.कुमुद खुप रडत होती.तिला वाटत होत सगळ संपलं.ती रडत रडत घराकडे जायला निघाली.पण तिच चमकणार्या काडीकडे लक्ष गेल.तिला वाटत होत या काडीला हात लावला की जर जादुगार बाहेर येत होता तर या काडीत काही ना काही असेल.तिने ती जादुची काडी हातात घेतली .आणि तिच्या कडे बघत होती. तिच्या लक्षात आल की चिमणीच्या तोंडात पोकळी आहे.यातून ही काडीमध्ये टाकली तर तशी काडी मध्ये टाकली.आणि चमत्कार झाला.चिमणी जिवंत झाली.ती उडत होती.कुमुद ला सगळ्याच आश्चर्य वाटलं.ती रडत होती.कुमुद चिमणीला म्हणाली सगळ्यांना जिवंत कर..तर चिमणी म्हणाली रडू नको.सगळे जिवंत होतील .मी करेल जिवंत.कारण तु मला जिवंत केलंस.मी जादुची चिमणी आहे.मी या मंदिरात रोज यायचे आणि गणपती मंदिरात फुलांची उधळण करायचे .एक दिवस मला या जादुगाराने बघितल .त्याला कळल माझ्यात जादु आहे.मग त्याने मला पकडलं.मी माझ्या जादुने निघून जात होते.पण तो मला म्हणाला तुझ्या जादुचा मला गावातल्या लोकांच्या भल्यासाठी उपयोग करायचा.तो खर बोलत होता.त्याने माझ्यामदतीने गावातल्या लोकांची मदत केली.पण गावातल्या लोकांना त्याचा चांगुलपणा बघवला नाही.लोकांनी त्याला मारायचे ठरवले व जंगलात आणले.पण माझ्या कडे जादु होती म्हणून मी माझ्या तोंडातून काडी काढली आणि त्याचा जीव त्या काढीत टाकला.माझ्यातून जादुची काडी काढल्यामुळे मी आणि तो असाच जंगलात पडून होतो.तु आली आणि त्या काडीला हात लावला तसा तो प्रकट झाला.तु जिवंत करशील माहित होत म्हणून तुला चिमणी दिली.पण तुला रोज भेटायला बोलवायचा कारण चिमणी आणि काडी रोज भेटली तरच जादु कायम राहते.कुमुदला सगळ्या गोष्टीचं नवल वाटत होत.ती म्हणाली सगळे जिवंत होतील ना ..चिमणीने सगळ्यांना जिवंत केले.कुमुदला आनंद झाला.चिमणी निघून गेली .तिने सर्व जादु जादुगाराला दिली.ती स्वतःची प्रतिकृती सोडून गेली.पण जादुगार गावात जात नव्हता तो जंगलात राहत होता.कुमुद त्याला भेटायला रोज जंगलात जात होती.जादुगाराने कुमुदकडे जादुची चिमणी दिली होती.
कुमुदला आता स्वतः बरोबर गावातल्या लोकांचे दुःख समजत होते.कितीही जादु केली तरी दुःख संपतच नव्हते.कुमुदला वाईट वाटल.किती दुखी लोक आहेत ना समाजातील.त्यांना कशातच आनंद नसतो.त्यांच्या कितीही इच्छा पुर्ण झाल्या तरी ते समाधानी नसतात .कायम दुखी असतात.ती मनाशीच म्हणाली म्हणूनच देव यांच्या सगळ्या इच्छा पुर्ण करत नसेल.ती जादुगाराला म्हणाली .मी जादुच्या मदतीने गावातल्या लोकांना साह्य करत आहे.पण त्यांचे दुख संपतच नाही.अस का जादुगार.तर जादुगार म्हणाला.मी पण पुर्वी सर्वांना मदत करत होतो.पण गावातल्या दृष्ट लोकांना अस वाटत होत कि जादुचा उपयोग त्यांनी करावा इतरांवर आपल वर्चस्व दाखवायच .त्यांनी माझ्याकडून जादु मिळवण्यासाठी खुप प्रयत्न केले .मला मारले पण म्हणून मी जादुनी काडीचे रूप घेतले. आणि जंगलात येऊन पडलो.जो खर्या मनाचा सच्चा असतो.त्याला मी मदत करतो.तु तशीच आहेस म्हणून तुला मी मदत केली.तुझ्या मनात काहीच नाही तु निष्पाप आहे.म्हणून तुला मी जादुची चिमणी दिली.तुला त्या चिमणीचा उपयोग होईल म्हणून दिली.तुझा स्वभाव इतका चांगला कि तु पुर्ण गावाला मदत केलीस.त्यामुळे तु मला आता भेटायला नाही आलीस तरी मी कायम तुझ्यासोबत असेल.आणि जादुची चिमणीही असेल.तर कुमुद म्हणाली.मला काय करायची आता जादुची चिमणी मला जे हव तो मिळाल.पण मी एक गोष्ट या चिमणीला मागेल.गावातल्या लोकांचा अहंकार जाऊ दे…लोक आहे त्यातच समाधानी राहू देत.सर्वांच्या इच्छा पुर्ण होऊ देत.एकमेकांवरील द्वेश जाऊ देत.आणि सर्वांना खुश ,आनंदी ठेव.जादुगार चिमणीच बोलणं एकूण खुश झाला.कुमुदने ती चिमणी जादुगाराला परत केली.
जादुगाराने खुश होऊन त्याची सर्व जादु कुमुदला दिली .आणि तो गणपतीच्या मंदिरात राहू लागला.
अश्विनी पांडे