महानुभाव पंथाच्या मागण्यांसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार :  डॉ. भागवत कराड

 

 महानुभाव पंथाच्या मागण्यांसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार :  डॉ. भागवत कराड  
नाशिक: अश्विनी पांडे
भारतीय संस्कृती तथा हिंदू धर्म संस्कृती टिकवण्याचे कार्य या धर्मातील अनेक पंथांनी केले , त्यामध्ये महानुभाव पंथाचा अग्रक्रमाने उल्लेख करावा लागेल. या पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांनी संपूर्ण मानव जातीला तथा जगाला समतेचा आणि मानवतेचा संदेश दिला, तसेच  या संमेलनात  पंथाच्या मागण्या तथा ठराव मांडण्यात आले, त्याचा मी स्वतः केंद्र सरकारकडे पाठपुरावा करेल असे आश्वासन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी दिले.
        महानुभाव संमेलनाच्या समारोपप्रसंगी डॉ. कराड बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर उपाध्य कुलाचार्य महंत वर्धनस्थ बाबा बिडकर, आचार्य प्रवर महंत सुकेणेकर बाबा शास्त्री, कविश्वर कुलाचार्य विद्वांस बाबा, महंत कारंजेकर बाबा, संमेलन स्वागत समितीचे सदस्य दिनकर पाटील, दत्ता गायकवाड, माजी आमदार बाळासाहेब सानप, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर, आमदार सरोज अहिरे, आमदार सुनील भुसारा यांच्यासह संत, महंत, तपस्विनी, पुजारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
      डॉ. कराड म्हणाले की, श्री चक्रधर स्वामी यांना चातुर्वर्ण व्यवस्था मान्य नव्हती, त्यामुळेच त्यांनी त्याविरुद्ध आवाज उठवत सर्वसामान्य जनतेला खर्‍या धर्माची शिकवण दिली. सर्व माणूस हा समान आहे, स्त्री शूद्र यांना देखील धर्म आणि ईश्वर प्राप्तीचा अधिकार आहे, असा संदेश श्री चक्रधर स्वामी यांनी दिला. धर्माची दारे त्यांनी अखिल मानव जातीसाठी खुली केली. त्याचप्रमाणे महानुभाव पंथाच्या मागण्या रास्त असून श्री चक्रधर स्वामींचे जन्मस्थान गुजरात येथील भडोच तथा भरवस नगरी येथील हे सर्वांसाठी खुले पाहिजे, हा प्रश्न सोडविण्यासाठी  गुजरातचे मुख्यमंत्री यांची भेट घेऊन त्या संदर्भात चर्चा करणार आहे.
        गुजरातचे मंत्री जितू चौधरी म्हणाले, चक्रधर स्वामींचे जन्मस्थानाचा प्रश्न निश्चितच सोडविला जाईल, असे आश्वासन चौधरी यांनी यावेळी बोलताना दिले. यावेळी अखिल भारतीय धर्म जागरण मंचचे राष्ट्रीय संयोजक शरदराव ढोले यांनीही आपले विचार मांडले.   याप्रसंगी संमेलनाचे संयोजक दिनकर पाटील यांनी विविध ठराव मांडले.  याप्रसंगी दत्ता गायकवाड आणि माजी आमदार बाळासाहेब सानप यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन महंत चिरडे बाबा यांनी केले.  
      संत, महंत आणि राजकीय नेते पदाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. महानुभाव पंथाच्या सप्तग्रंथांचे प्रकाशन तसेच अन्य धार्मिक ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले.  यावेळी उदय सांगळे,सचिव प्रकाश घुगे , खजिनदार प्रकाश ननावरे, प्रभाकर  भोजने, अरुण महानुभव, विश्वास का. नागरे, छबू नागरे,लक्ष्मण जायभावे, भास्करगावित, उदय सांगळे आदी उपस्थित होते.
      कार्यक्रमास स्वागत समिती सिताराम पाटील आंधळे, अरुण भोजने,  राजेंद्र जायभावे. संजय भोजने, भास्कर सोनवणे, सागर जैन, योगेश मस्के, नंदू हांडे, किरण मते, सुरेश भाऊ डोळसे, अनिल जाधव, श्याम कातोरे, प्रदीप वैद्य, मुकुंद बाविस्कर, अनिल जाधव, साहेबराव आव्हाड, रवी पेखळे, शांताराम खांदवे, श्याम कातोरे, प्रदीप वैद्य, किरण भडांगे, अमोल पाटील,  अनिल घुगे, वाल्मीक मोकळ, विकी भुजबळ, सुरेश नाना भोजने आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *