महापालिका, जिप, पंचायत समितीच्या सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये निवडणुका
मुंबई: राज्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घडणाऱ्या राजकीय घडामोडी मुळे लांबणीवर पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये मुहूर्त लागण्याची शक्यता आहे, राज्य निवडणूक आयोगाने मतदार याद्या तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत,
राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समित्यांची मुदत संपून 1 वर्षहून अधिक कालावधी झाला आहे, सद्या जिल्हा परिषद आणि महापालिकांचा कारभार प्रशासक पाहत आहेत, निवडणूक लढवणाऱ्या इच्छुकांचा धीर सुटत चालला आहे,अनेकांचा यापूर्वीच लाखो रुपयांचा खर्च झालेला आहे त्यातच आधी शिवसेनेतील फूट त्यातून झालेला सत्ता संघर्ष, कोर्टबाजी यामुळे निवडणुका लांबणीवर पडत गेल्या, आता अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी मध्ये फूट पडली, त्यामुळे निवडणुका कधी होणार याची चिंता निर्माण झाली असतानाच राज्य निवडणूक आयोगाने मतदार याद्या अद्ययावत करण्याचा जीआर काढल्याने निवडणुका सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता निर्माण झाली आहे,