संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेनिमित्त मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते महापूजा

संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेनिमित्त

मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते महापूजा

नाशिक: प्रतिनिधी

संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेनिमित्त शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी आज पहाटे त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिरात सपत्नीक शासकीय महापूजा केली.

मंत्री श्री. भुसे यांच्याबरोबर दिंडोरी तालुक्यातील गणपत गाडेकर, सौ. गाडेकर यांना पूजेचा मान मिळाला. यावेळी सौ. अनिता भुसे, त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, पोलिस उप अधीक्षक वासुदेव देसले, तहसीलदार गणेश जाधव, त्र्यंबकेश्वर नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पाटील, संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानचे अध्यक्ष ॲड. सोमनाथ घोटेकर, सचिव श्रीपाद कुलकर्णी, संत तुकाराम महाराज यांचे वंशज माणिक महाराज मोरे, श्री संत मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष
ॲड. रवींद्र पाटील, पुजारी जयंत महाराज गोसावी आदींसह लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

महापूजेनंतर आयोजित कार्यक्रमात बोलताना मंत्री श्री. भुसे म्हणाले की, पौष वारी निमित्त संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या समाधीच्या दर्शनाची संधी मिळाली. राज्यातील शेतकरी, कामगार आणि नागरिकांच्या जीवनात सुख, समृध्दी येऊ दे, अशी प्रार्थना केल्याचे त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक घेण्यात येईल. या माध्यमातून त्र्यंबकेश्वर परिसर विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून प्रबोधनाचे कार्य सुरू असते. त्यांचेही मार्गदर्शन घेण्यात येईल.

नगराध्यक्षा श्रीमती तुंगार, माधवदास राठी, भूषण अडसरे, अक्षय भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. पौष वारी निमित्त भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Bhagwat Udavant

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

9 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

9 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

9 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

9 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

9 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

9 hours ago