वसंत व्याख्यानमालेचा महाराष्ट्राची  हास्यजत्राने समारोप

 

 

नाशिक : प्रतिनिधी

 

वसंत व्याख्यानमाला शताब्दी महोत्सवी वर्ष सोनी मराठी चॅनेलवरील लोकप्रिय मालिका महाराष्ट्राची हास्यजत्रा – नाशिक स्पेशल या कार्यक्रमाचे सादरीकरण करून समारोप करण्यात आला. व्यासपीठावर वसंत व्याख्यानमाला शताब्दी वर्ष स्वागत समितीचे अध्यक्ष ना. दादाजी भुसे, व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी, सोनी मराठीचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट अमित फाळके, महाराष्ट्राची हास्यजत्रा या मालिकेचे दिग्दर्शक- निर्माते सचिन गोस्वामी, सचिन मोटे, असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट गणेश सागडे तसेच या मालिकेत काम करणारे कलावंत समीर चौघुले, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव आणि सुत्रसंचालिका प्राजक्ता माळी उपस्थित होते.

यावेळी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार ना. दादाजी भुसे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी व्याख्यानमालेच्या वतीने देण्यात येणाऱ्या मानपत्राचे वाचन लेखक दत्त पाटील यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात मोरया मोरया या गणेश वंदनाने झाली. पृथ्वीक, ओमकार राऊत आणि शिवाली यांच्या बहारदार स्किटने हास्यजत्राचे सादरीकरण सुरू झाले.

यावेळी समीर चौघुले, प्रसाद खांडेकर, अरुण कदम, नम्रता संभेराव, वनिता खरात, प्रभाकर मोरे, ईशा डे, चेतना भट, शर्मेश बेटकर, प्रथमेश शिवलकर, प्रियदर्शनी इंदलकर, निखिल बने, शाम राजपूत, रसिका वेंगुर्लेकर, दत्ता मोरे या विनोदवीरांनी नाशिककर श्रोत्यांना मनमुराद हसविले. कार्यक्रमास नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी केले.कार्यक्रमासाठी नाशिककर नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *