नाशिक

श्री श्री रविशंकर यांच्या उपस्थितीत महासत्संग ,राम रक्षा स्तोत्र पठण

श्री श्री रविशंकर यांच्या उपस्थितीत
महासत्संग ,राम रक्षा स्तोत्र पठण
नाशिक : प्रतिनिधी
आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेला चाळीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री.श्री. रवीशंकर सद्या संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देत आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार दिनांक 28 रोजी ठक्कर डोम येथे सायंकाळी 6 वाजता महासत्संग आणि राम रक्षा स्तोत्र पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती काल पत्रकार परिषदेत देण्यात आली.
श्री श्री रविशंकर यांच्या महासत्संगाचे औचित्य साधून भक्ती की लहर हा कार्यक्रम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे.  आर्ट ऑफ लिव्हिंगच्या स्वयंसेवकांनी  घरोघरी जाऊन तसेच मॉल, मंदिरे येथे ज्ञानगंगा या कार्यक्रमाची माहिती देऊन सर्वांना आमंत्रित केले आहे.  तसेच आज दिनांक 23 रोजी ठक्कर डोम येथून सकाळी 8 ते 10 या वेळात बाइक रॅलीचे  आयोजन करण्यात आले आहे. 25 व 26 ला मॉल्समध्ये फ्लॅश मॉबच्या माध्यमातून युवक-युवती नाशिककरांना 28 तारखेला होणार्‍या ज्ञानगंगा या कार्यक्रमाचे निमंत्रण देणार आहेत.  या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगचे उल्हास पाटील, स्मृती ठाकूर, विजय हाके, चिराग पाटील, करुणासागर जिरे,  प्रसाद पिंपळे,  किशोर पाटील, नीलम गायधनी, ऍड. विशाल चव्हाण, स्वामी वैशंपायन, स्वामी प्रणवानंद, विजय कल्याणकर यांच्यासह आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक, स्वयंसेवक कार्यरत आहेत. या कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी 9604615011 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन आर्ट ऑफ लिव्हिंगने केले आहे.
Ashvini Pande

Recent Posts

कांद्याचे भाव गडगडणार

कांदा उत्पादकांवर ओढवणार आर्थिक संकट कांद्याचे भाव गडगडणार लासलगाव :- समीर पठाण गेल्या काही दिवसांपासून…

4 hours ago

यापूर्वीच्या दोन समित्यांच्या अहवालाचे काय झाले? कांदा संघटनेने अध्यक्ष भारत दिघोळे यांचा सरकारला सवाल

यापूर्वीच्या दोन समित्यांच्या अहवालाचे काय झाले? कांदा संघटनेने अध्यक्ष भारत दिघोळे यांचा सरकारला सवाल नाशिक:…

6 hours ago

वधूचा घागरा बदलून न दिल्याने  नियोजित वराने केले असे काही….

  वधूचा घागरा बदलून न दिल्याने  नियोजित वराने केले असे काही.... शहापूर : साजिद शेख…

24 hours ago

मृत्यू पश्चातही आदिवासींच्या नशिबी  पुन्हा मरण यातनाच

मृत्यू नंतरही  आदिवासींच्या नशिबी  पुन्हा मरण यातनाच मोखाडा: नामदेव ठोंमरे मोखाडा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या…

1 day ago

सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाचे आज अधिवेशन

सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त  आज राज्यस्तरीय भव्य अधिवेशन नाशिक प्रतिनिधी सेवा…

1 day ago

त्र्यंबकेश्वर श्रावणी सोमवारी भाविकांसाठी रा. प.कडून 33 जादा बसेसची सोय

नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4…

1 day ago