नाशिक

नाशिकमध्ये महावादनाचा जल्लोष

25 ढोल पथकांच्या दमदार सादरीकरणाने वातावरण दुमदुमले

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महानगरपालिका व नववर्ष स्वागत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शीख समाजाचे नववे गुरू तेगबहादूर यांच्या 350 व्या स्मृती वर्षानिमित्त त्यांना समर्पित करण्यात आलेल्या भव्य महावादन कार्यक्रमाने शहरातील वातावरण ढोल-ताशांच्या गजराने दणाणून गेले. शहरातील विविध भागांतील 25 ढोल पथकांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत दमदार वादन सादर केले. पारंपरिक ढोल-ताशांच्या तालावर उपस्थित नागरिकांनीही उत्साहाने प्रतिसाद देत कार्यक्रमाचा मनमुराद
आनंद घेतला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध सिनेकलाकार प्रवीण तरटे उपस्थित होते. त्यांच्यासोबत नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदे, मनपा आयुक्त मनीषा खत्री तसेच स्थायी समिती अध्यक्ष मच्छिंद्र सानप यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
तसेच नववर्ष स्वागत समितीचे अध्यक्ष शिवाजी बोंदारडे, चंद्रशेखर जोशी, प्रफुल्ल संचेती व समितीचे सर्व सदस्य या कार्यक्रमात उपस्थित होते. सर्व ढोल पथकांनी सादर केलेल्या जोशपूर्ण वादनामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. पारंपरिक संस्कृती जपण्याचा संदेश देणारा हा महावादन कार्यक्रम नागरिकांच्या मोठ्या प्रतिसादात उत्साहात पार पडला.

Mahavadana festival celebrated in Nashik

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

6 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

6 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

6 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

6 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

7 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

7 hours ago