नाशिक

महावितरण बॉक्स बनले धोकादायक

नागरिकांचे महावितरण कंपनीला निवेदन

सिडको : विशेष प्रतिनिधी
पाथर्डी फाटा परिसरातील आनंदनगर, नरहरीनगर व कडवेनगर भागात महावितरणच्या वीज वितरण बॉक्सची अवस्था अत्यंत धोकादायक बनली असून, तत्काळ दुरुस्तीची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवीन नाशिक उपाध्यक्ष चेतन चंद्रकांत फेगडे यांनी केली आहे. यासंदर्भात अतिरिक्त उपअभियंता, उपविभाग पाथर्डी कार्यालयात लेखी निवेदन दिले आहे.
या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे संबंधित भागातील वीज वितरण बॉक्सचे झाकण तुटलेले असून, आतील विद्युत तारा उघड्या अवस्थेत आहेत. त्यामुळे शॉर्टसर्किट, विद्युत धक्का लागणे किंवा आग लागण्याचा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः लहान मुले, पादचारी व नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर हा धोका अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात
आली आहे.
वितरण बॉक्स अनेक दिवसांपासून खराब अवस्थेत असून, वारंवार तक्रारी करूनही महावितरण प्रशासनाकडून ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात रहदारी असल्याने कधीही गंभीर दुर्घटना घडू शकते, अशी भीती व्यक्त करण्यात
आली आहे.
वीज वितरण बॉक्सची तत्काळ दुरुस्ती करून सुरक्षित कव्हर बसवावे, अन्यथा दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी महावितरण प्रशासनावर राहील, असा इशाराही देण्यात आला आहे. या निवेदनावर चेतन फेगडे यांच्यासह पूजा गुप्ता, विशाल सूर्यवंशी, मनीषा जोशी, रमेश शेळके, जयश्री आव्हाड, भरत सावंत, संतोष भंगाळे, रामप्रकाश विश्वकर्मा, लीलावती विश्वकर्मा आदी नागरिकांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Mahavitaran box has become dangerous

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

9 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

10 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

10 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

10 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

10 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

10 hours ago