नाशिक

महावितरणची  वीजचोरीविरुद्ध मोहीम

एकाच दिवसात २६१ जणांवर कारवाई
मोहिमेतील पथकांमध्ये अभियंते, जनमित्रांचा समावेश
नाशिक:
वीजचोरी व अनधिकृत वापराविरोधात महावितरण गंभीर असून, याविरोधात ठोस पाऊले उचलीत कारवाईचे सत्र सातत्याने सुरु ठेवीत ०८ जून २०२२ या एकाच दिवशी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेमध्ये महावितरणच्या नाशिक मंडळात पथकाने वीज चोरी व गैरवापर करणाऱ्याविरुद्ध आकस्मिक कारवाई केली. यामध्ये २ हजार ४४ विद्युत ग्राहकांची मीटर तपासणी करण्यात येऊन त्यामध्ये नाशिक शहर १ व २, नाशिक ग्रामीण आणि चांदवड या चारही विभागामध्ये भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५ नुसार २३६ जणांवर तर कलम १२६ नुसार २५ ग्राहकांवर अशा एकूण २६१ जणांवर कारवाई करण्यात आली आहे .
वीजहानी, गळती व वीजचोरी कमी करण्यासाठी जिल्ह्यात महावितरण सातत्याने प्रयत्नशील असून नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता दिपक कुमठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक मंडळाचे अधिक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारी अभियंते धनंजय आहेर, माणिकलाल तपासे, राजाराम डोंगरे, रवींद्र आव्हाड यांचेसह विविध पथकामध्ये अभियंते, अधिकारी, कर्मचारी व जनमित्र यांनी या मोहिमेत सहभाग घेतला..
वीज मिटरमध्ये हस्तक्षेप करून थेट वीजचोरी करणाऱ्यांवर भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५ नुसार कारवाई करण्यात आली यामध्ये नाशिक शहर १ मध्ये ०६, नाशिक शहर २ मध्ये  ६२, नाशिक ग्रामीण मध्ये ९८, चांदवड मध्ये  ७० जणांवर कारवाई करण्यात आली.
तर विजेचा गैरवापर व घेतलेल्या कारणाशिवाय दुस-या कारणासाठी वापर करीत असल्याचे आढळून आलेल्याविरुद्ध भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १२६ नुसार कारवाई करण्यात आली. यामध्ये नाशिक शहर १ मध्ये ०५, नाशिक शहर २ मध्ये ०८, नाशिक ग्रामीण मध्ये ७, चांदवड मध्ये ५ जणांवर कारवाई करण्यात आली अशा प्रकारे एकूण कलम १३५ व कलम १२६ नुसार २६१ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
यामध्ये नाशिक मंडळातील २ हजार ४४ विद्युत ग्राहकांची मीटर तपासणी करण्यात आली होती. या मोहिमेमध्ये वीज देयक न भरणाऱ्या ज्या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता अशा ठिकाणी सुद्धा बेकायदेशीर वीज वापर करताना आढळल्याने त्यांचे विरुद्ध सुद्धा कारवाई करण्यात आली.
वीजचोरी व गैरप्रकार याविरोधात महावितरण गंभीर असून यापुढे सुद्धा अशाप्रकारे गोपनीय पद्धतीने, सामूहिकरीत्या आणि सातत्याने आकस्मिक कारवाई करण्यात येणार आहे. तरी ग्राहकांनी वीजचोरी, अनधिकृत व गैरवापर टाळून अधिकृत वीज जोडणी घेण्याचे आवाहन महावितरणने  केले आहे.
Ashvini Pande

Recent Posts

माणिकराव कोकाटे अजित दादांच्या भेटीला

मुंबई: विधानसभेत रमी खेळत असल्याच्या मुद्द्यावरून जोरदार टीका झाल्यामुळे चर्चेत आलेले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे…

3 hours ago

ठाकरे गटाच्या या बड्या नेत्यावर नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल

खासदार संजय राऊत यांच्यावर नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नांदगाव आमिन शेख शिवसेना उद्धव बाळासाहेब…

19 hours ago

मुलींचा सांभाळ करण्याचा कंटाळा आल्याने  आईने उचलले भयानक पाऊल

  मुलींचा सांभाळ करण्याचा कंटाळा आल्याने  आईने उचलले भयानक पाऊल शहापूर : साजिद शेख शहापूर…

24 hours ago

ट्रॅपची माहिती होती, तर सतर्क का केले नाही?

मंत्री गिरीश महाजन यांचा एकनाथ खडसे यांना सवाल नाशिक : प्रतिनिधी पुण्यात रेव्ह पार्टीवर पोलिसांनी…

1 day ago

साप्ताहिक राशिभविष्य

दि. 27 जुलै ते 2 ऑगस्ट 2025 पुरुषोत्तम नाईक मेष : आप्तेष्टांच्या गाठीभेटी या सप्ताहात…

1 day ago

महापालिका जिंकायचीय, वाद टाळून कामाला लागा

मंत्री गिरीश महाजन : सुनील बागूल, राजवाडे यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश नाशिक ः प्रतिनिधी भारतीय…

1 day ago