सविता दिवटे-चव्हाण
प्रत्येक स्त्रीला माहेरची नितांत ओढ असते. तिच्या आयुष्याची सुरुवातीची काही वर्षे माहेरच्या मातीत गेलेली असतात. आई-वडील, भावंडे, माहेरची माणसं, गाव, माती निसर्ग यांबद्दल अनामिक आकर्षक तिला असते. माहेरची माणसं कुठेही भेटली तरी तिला खूप आनंद होतो. सासरी कितीही चांगली परिस्थिती असली तरी चार दिवस माहेरी जाऊन माहेरपण अनुभवण्यात वेगळेच सुख असते. आई-वडील, भावंडे, भाचे या जिव्हाळ्याच्या माणसांत परमानंद असतो.संसार, नोकरी, आपले दैनंदिन जीवन विसरून फक्त माहेरीच पुन्हा बालपण जगता येते.कधीतरी बालमैत्रिणींची भेट होऊन गप्पांची मैफल रंगते.जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. आई, वहिनींच्या हातचे सुग्रास जेवण, चेष्टामस्करी मनाला सुखावून जाते. आईने आपल्या आवडीनिवडी जपणं, काळजी घेणं, लेक माहेरी आल्याचे वडिलांच्या चेहर्यावरील समाधान, त्यांचं नातवंडांत रमून जाणं, भाऊ-बहिणींच्या तासन्तास चालणार्या गप्पा, जणू बाहेरच्या जगाचा विसर पडतो. माहेरी घालवलेले सुखद क्षण फक्त तिचे असतात. तिची विश्रांतीची जागा आणि आपले हट्ट पुरवून घ्यायला माहेर हे तिचं हक्काचं ठिकाण असतं. असं माहेर ज्या स्त्रीला मिळतं ती स्वतः भाग्यवान समजते. दिवाळी, रक्षाबंधन या सणांना तर माहेरशिवाय माहेरवाशीणला चैन पडत नाही. छोट्याशा खेडेगावातील माहेर असेल तर संपूर्ण गाव आणि निसर्गाचीच ती माहेरवाशीण होते. गावात प्रवेश करताच शाळा, गावातील वेगवेगळी मंदिरे, सार्वजनिक पाणवठा, गल्लीतील दंगामस्ती डोळ्यात साठवत ती घरात प्रवेश करते. काका-काकू, चुलत भावंडे, शेजारी सगळीकडे पाहुणचार असतो.शेतात मनसोक्त फिरणे, चिंचा, बोरं, आंबे, भाजीपाला, गुरेढोरे आणि तेथील नागमोडी पायवाटा तिला स्त्रीला साद घालत असतात आणि नकळत तिची पावलं तिकडे वळतात.झाडाला बांधलेला झोका तिला गतकाळात घेऊन जातो.झोक्याच्या आंदोलनाबरोबर ती बालपणात हरवते आणि भाच्यांच्या संगतीत बालपणातील गमतीजमती आठवतात. चुलीवरचे खमंग जेवण तिला तृप्ती देऊन जाते. आता धावपळीच्या जगात माहेरी जाऊन रहायला फारसा कुणाला वेळ नाही. पण तरीही ती वेळ मिळेल तसे माहेरचे सुखाचे क्षण वेचण्याचे प्रयत्न करते. कारण माहेरपण तिच्या मनाला एक सकारात्मक ऊर्जा देऊन पुढील काही काळासाठी जणू एक टॉनिक बनते.
कसबे सुकेणे येथील तिडके वस्तीवर जेरबंद झाला बिबट्या कसबेसुकेणे: येथील दशरथ पोपट तिडके यांच्या शेत…
सातपूर: प्रतिनिधी सातपूर एमआयडीसीतील ज्योतीस्ट्रक्चर कंपनीला आज दुपारच्या सुमारास आग लागली . या आगीचे कारण…
लासलगावी कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक ; कांद्याचे लिलाव पाडले बंद लासलगाव:-समीर पठाण केंद्र सरकारने कांद्यावरील…
मनमाड : प्रतिनिधी मराठीत एक म्हण आहे साधु संत येता दारी तोच दसरा दिवाळी ती…
ऑनर किलींग रोखण्यासाठी आता हेल्पलाईन तर गेस्ट हाऊस होणार सेफ होम ! निर्णयाचे अंनिस कडून…
पारा ५.७ अंशावर स्थिर ,द्राक्षबागायतदार अस्थिर! निफाड : प्रतिनिधी शहरासह तालुक्यात थंडीने मुक्काम. वाढविला आहे…