नाशिक

मोलकरणीची हात की सफाई; चोरीचा गुन्हा दाखल

नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
वयोवृद्ध महिलेच्या घरात काम करणार्‍या मोलकरणीने घरातील सुमारे चार तोळे सोन्याचे दागिने तसेच रोकड असा एकूण सुमारे साडेचार लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना बोधलेनगर परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी नितीन बाळकृष्ण रोठे (रा. श्यामतीर्थ अपार्टमेंट, बोधलेनगर, नाशिक) यांनी उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची वयोवृद्ध आई बोधलेनगर येथील शीतलधारा अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास असून, त्यांच्या घरात इंदू सोनवणी नावाची महिला मोलकरीण म्हणून काम
करत होती. या मोलकरणीने घरातील 20 ग्रॅम वजनाचे सुमारे 40 हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण, 15 ग्रॅम वजनाचा 30 हजार रुपये किमतीचा सोन्याचा नेकलेस, पाच ग्रॅम वजनाचे 15 हजार रुपये किमतीचे सोन्याचे वेल, तीन ग्रॅम वजनाचे 12 हजार रुपये किमतीचे कानातील टॉप्स तसेच सुमारे साडेतीन लाख रुपयांची रोकड असा एकूण 4 लाख 47 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तसेच, फिर्यादीची आई वयोवृद्ध असल्याची जाणीव असूनही आरोपी मोलकरणीने त्यांच्या बँक खात्यातून काही रक्कम स्वतःच्या खात्यात ऑनलाइन पद्धतीने ट्रान्स्फर केल्याचेही उघड झाले आहे. हा प्रकार 1 ऑक्टोबर ते 15 डिसेंबर या कालावधीत घडला.

Maid's hand cleaning; theft case registered
 
Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

9 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

9 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

9 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

9 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

9 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

9 hours ago