महाराष्ट्र

मजूर फेडरेशनचा निकाल घोषित, प्रस्थापितांना धक्का

विजयी उमेदवारांचा गुलाल उधळून जल्लोष

नाशिक : प्रतिनिधी

मजुर फेडरेशनच्या निवडणुकीदरम्यान काल काशीमाळी समाज मंगल कार्यालय, ट्रॅक्टर सेंटरच्या मागे, द्वारका येथे मतमोजणी करण्यात आली. यावेळी घोषित करण्यात आलेल्या निकालाने प्रस्थापितांना धक्का दिला तर विजयी उमेदवांनी गुलाल उधळत फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष साजरा केला.
जिल्हा मजुर सहकारी संस्थांचा सहकारी संघ च्या निवडणूकीदरम्यान जिल्ह्यातील एकूण 20 संचालक पदांच्या जागांपैकी 15 तालुक्यांतील 15 सर्वसाधारण गटापैकी 8 जागांवर बिनविरोध निवड करण्यात आली. तर 7 जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. याशिवाय इतर मागास प्रवर्ग गट (1 जागा), अनुसुचित जाती/जमाती गट (1 जागा), महिला राखीव गट (2 जागा), विमुक्त जाती भटक्या जमाती/ विशेष मागास प्रवर्ग गट (1 जागा) अशा एकूण 5 जागांसाठी मतदान घेण्यात आले. एकूण 12 जागांसाठी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली.

बिनविरोध निवड

बिनविरोध निवडून आलेल्या 8 संचालकांपैकी सर्वसाधारण गटासाठी मालेगावमधून राजेंद्र लक्ष्मण भोसले, नांदगावमधून प्रमोद सुदामराव भाबड, निफाडमधून अमोल सुदाम थोरे, सटाण्यामधून शिवाजी अभिमान रौंदळ, दिंडोरीमधून प्रमोद रामभाऊ मुळाणे, त्र्यंबकेश्वरमधून संपत महादू सकाळे, कळवण मधून रोहित कौतिक पगार तर इगतपुरीमधून ज्ञानेश्वर निवृत्ती लहाने यांची निवड करण्यात आली.

सर्वसाधारण गटाचा निकाल

7 संचालकपदांसाठीच्या तसेच 5 प्रवर्गासाठीच्या निवडणुकीप्रक्रियेचा निकाल काल घोषित करण्यात आला. यामध्ये नाशिक सर्वसाधारण गटातून शर्मिला रमाकांत कुशारे या 85 मते मिळवून विजयी झाल्या. त्यांनी उत्तम मुरलीधर बोरोडे (74) मिलींद पुंडलिक रसाळ (1), योगेश (मुन्ना) रामराव हिरे (69) यांचा पराभव केला. निवडणूकी दरम्यान एकूण 242 मते पडली. यापैकी 229 मते वैध ठरली तर 13 मते अवैध ठरली.
येवला सर्वसाधारण गटातून सौ. धनवटे सविता भाऊसाहेब या 54 मते घेऊन विजयी ठरल्या. त्यांनी सौ. बोडके मंदा प्रविण (34) यांचा पराभव केला. एकूण मते 89 पडली. पैकी 88 मते वैध ठरली तर 1 मत अवैध ठरले.
सिन्नर तालुक्यासाठी झालेल्या निवडणुकीत भारत शिवाजीराव कोकाटे हे 32 मते मिळवून विजयी झाले त्यांनी दिनकर संतु उगले (30) यांचा पराभव केला. एकूण मते 63 पडली. यात 62 मते वैध ठरली तर 1 मत अवैध ठरले.
सुरगाणा तालुक्यातून गावित राजेंद्र शंकर हे 12 मतांनी विजयी ठरले त्यांनी आनंदा जानु चौधरी यांचा 4 मतांनी पराभव केला. आनंदा चौधरी यांना 8 मते मिळाली.
देवळा तालुक्यातून सतिष विश्वासराव सोमवंशी यांनी 45 पैकी 44 मते घेत उर्वरीत दोघा उमेदवारांना धोबीपछाड दिला. त्यांनी सुनिल धर्मराज देवरे, सुभाष पुंडलिक गायकवाड यांचा सपशेल पराभव केला. एकूण 45 मतांपैकी 1 मत बाद ठरले.
चांदवड गटातून शिवाजी बाबुराव कासव यांनी 30 मते घेत शरद केदू आहेर (26) यांचा पराभव केला.
पेठ तालुक्यातून 11 मतांपैकी सुरेश नामदेव भोये यांना 6 तर धुम मनोज पंडीत यांना 5 मते पडली. अटीतटीच्या लढतीत सुरेश भोये विजयी ठरले. भगवान लक्ष्मण पाडवी यांना भोपळाही फोडता आला नाही.

प्रवर्ग गटाचा निकाल

इतर मागास प्रवर्ग गटातून अर्जुन केरु चुंभळे यांनी 382 मते घेत पवन अंबादास अहिरराव (309), संदीप सुकदेव थेटे (312), मिलींद पुंडलिक रसाळ (2) यांचा पराभव केला. एकूण 1047 मतांपैकी 1005 मते वैध ठरली तर 42 मते अवैध ठरली.श
अनुसूचित जाती/जमाती गटातून शशिकांत बन्सीलाल उबाळे हे 404 मते घेऊन विजयी ठरले. त्यांनी किरण प्रभाकर निरभवणे (390), रविकांत विष्णू भालेराव (145), हेमंत शिवराज झोले (28), उत्तम दगा भालेवराव (15), अशोक शंकरराव रोकडे (10) यांचा पराभव केला. एकूण 1045 मतांपैकी 992 मते वैध ठरली तर 53 मते अवैध ठरली.
महिला राखीव गटातून दोन संचालक पदाच्या जागांसाठी झालेल्या निवडणूकीत सौ. दिप्ती अभिजीत पाटील (726), सौ. कविता प्रकाश शिंदे (648) या विजयी ठरल्या. पराभूत उमेदवार सौ. अनिता महेश भामरे यांना 398 मते पडली.
विमुक्त जाती भटक्या जमाती/विशेष मागास प्रवर्ग गटातून राजाभाऊ चिलाजी खेमनार हे विजयी ठरले. त्यांनी सुदर्शन कारभारी सांगळे (301), अप्पासाहेब विष्णु दराडे (286), सुरेश राजाराम देवकर (5), बन्सीलाल नारायण कुमावत (2) यांचा पराव केला. एकूण 1043 मतांपैकी 1005 मते वैध तर 38 मते अवैध ठरली.
निकालानंतर विजयी उमेदवारांनी फटाक्यांच्या आतषबाजीत ढोलताशांच्या गजरात गुलालाची उधडण करीत जल्लोष साजरा केला. निवडणूकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुरेश महंत यांनी काम पाहिले तर त्यांना संजय बडवर, संजय लोळगे, आर.पी. गायकवाड यांनी सहकार्य केले.

Bhagwat Udavant

Recent Posts

घिबली अ‍ॅपची कमाल; मशालच्या जागी कमळ!

घिबली अ‍ॅपची कमाल मशालच्या जागी कमळ! मनमाड : आमिन शेख सध्याचा जमाना डिजिटलचा आहे. दररोज…

1 day ago

नियोजित वधुचे अफेअर उघड, विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन

नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…

1 day ago

लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग

लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…

2 days ago

नाशिकरोडला डॉ. आंबेडकर यांची जयंती उत्साहात

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…

4 days ago

सिन्नर तालुक्यात अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम

शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर  प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…

4 days ago

शहरात पाण्याच्या टँकरची संख्या वाढली

80 फेर्‍या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…

4 days ago