मजूर फेडरेशनच्या चेअरमनपदी
भाबड, व्हा.चेअरमनपदी कुशारे
नाशिक : जिल्हा मजूर फेडरेशनच्या अध्यक्षपदी नांदगाव येथील प्रमोद भाबड तर व्हा.चेअरमनपदी शर्मिला कुशारे यांची निवड झाली. दोन्ही उमेदवार राजेंद्र भोसले गटाचे आहेत. भोसले यांच्याकडे वीस पैकी 12 संचालक होते. त्यामुळे चेअरमन, व्हा.चेअरमन भोसले गटाचेच होणार हे निश्चित होते. चेअरमनपदासाठी भोसले गटाकडून प्रमोद भाबड तर संपतराव सकाळे गटाकडून ज्ञानेश्वर लहाने. व्हा.चेअरमनपदासाठी भोसले गटाकडून शर्मिला कुशारे तर सकाळे गटाकडून सुरेश भोये यांनी अर्ज केले होते. मात्र, भोसले गटाच्या उमेदवारांना 12 तर सकाळे गटाच्या उमेदवारांना 8 मते मिळाल्याने भाबड आणि कुशारे विजयी घोषित करण्यात आले. या निवडीनंतर जल्लोष करण्यात आला.
फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…
लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…
हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…
मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…
देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…
शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…