मालेगाव बॉम्बस्फोटातील पीडित परिवार जाणार सुप्रीम कोर्टात
मनमाड : आमिन शेख
गेल्या सतरा वर्षांपासून न्यायच्या प्रतिक्षेत असलेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्वच्या सर्व आरोपींना न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली असल्याने या बॉम्बस्फोट प्रकरणात पीडित असलेल्या कुटुंबातील सदस्यांनी नाराजी व्यक्त केली असुन आम्हाला न्याय हवा आहे आणि यासाठी आम्ही उच्च न्यायालयात किंवा सुप्रीम कोर्टात दाद मागणार असल्याचे मत व्यक्त केले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की सतरा वर्षापूर्वी साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह इतर सात जणांवर मालेगाव येथील बडा कबरस्थान येथे झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी म्हणून अटक करण्यात आली होती यानंतर हा खटला तब्बल सतरा वर्षे सुरू होता आज विशेष न्यायालयाने पुराव्याअभावी यातील साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर व कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह इतर सात जणांची निर्दोष मुक्तता केली आहे या खतल्याचा निकाल लागताच मालेगाव येथील हिंदुत्ववादी संघटनांनी जल्लोष साजरा केला तर या बॉम्बस्फोटात मृत पावलेल्या व जखमी झालेल्याच्या नातेवाईक यांनी निषेध व्यक्त केला व आम्हाला इंसाफ(न्याय) हवा अशी मागणी केली न्यायालयाने त्यांना जरी पुराव्या अभावी मुक्त केले असले तरी आम्ही उच्च न्यायालयात किंवा वेळ पडली तर सुप्रिम कोर्टात दाद मागणार असल्याचे सांगितले.
लोकांच्या जीवाची किंमत नाही का..?
गेल्या 17 वर्षांपूर्वी मालेगाव मधील बडा कब्रस्तान येथे शुक्रवारच्या दिवशी नमाज पठाण झाल्यानंतर एक बॉम्बस्फोट झाला होता या बॉम्बस्फोटात सहा जण मृत्युमुखी पडले होते तर अनेक जण जखमी झाले होते यामध्ये साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर व कर्नल पुरोहित यांना मुख्य आरोपी करून त्यांच्यावर खटला भरवण्यात आला होता एन आय ए च्या विशेष पथकाने तपास करून प्रज्ञा सिंग ठाकूर व कर्नल पुरोहित यांना आरोपी करून जेलमध्ये देखील टाकले होते मात्र तपास झाल्यानंतर 17 वर्षानंतर अचानक पुराव्या अभावी या सर्वांना निर्दोष मुक्तता देण्यात आली आहे मुळात या घटनेचा सखोल तपास होण्याची गरज असून आजचा निकाल ऐकून मालेगावच्या लोकांच्या जीवाची किंमत नाही का असा संतप्त सवाल माजी आमदार आसिफ शेख यांनी उपस्थित केला आहे
हिंदुत्ववादी संघटनांतर्फे जल्लोष
मालेगाव येथील बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर तसेच कर्नल पुरोहित यांच्यासह इतर सात जणांना एन आय ए च्या विशेष न्यायालयाने पुरावे अभावी आज निर्दोष मुक्तता दिली याची माहिती मिळतात मालेगावातील हिंदुत्ववादी संघटनांनी जोरदार जल्लोष साजरा केला फटाक्यांची आतिश बाजी करत मिठाईवाटप केली साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर कर्नल पुरोहित यांच्यासह सर्व निर्दोष मुक्तता करण्यात आलेल्या आरोपींची पोस्टर घेऊन मिरवणूक काढली