नाशिक: प्रतिनिधी
संपूर्ण राज्यात गाजलेल्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल आज जाहीर करण्यात आला. न्या, ए के लाहोटी यांनी या निकालाचे वाचन केले. 2008 मध्ये झालेल्या या बॉम्बस्फोटप्रकरणी कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा सिंग यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तब्बल 17 वर्षानंतर या खटल्याचा निकाल आज लागला. यात सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात पंचनामा व्यवस्थित झाला नाही, कट शिजला परंतु सिद्ध करण्यासाठी पुरावे नाहीत, कर्नल पुरोहित यांनी आरडीएक्स आणले याला काहीच पुरावा आढळून आला नाही, ब्लास्ट मध्ये वापरलेली बाईक प्रज्ञा सिंग यांची होती हे कोर्टात सिद्ध करता आले नाही. यूपीए कलम लावणे योग्य नव्हते, गुप्त बैठका झाल्याचे सिद्ध होत नाही. आरडीएक्स बॉम्ब पुरोहित यांनी आणल्याचा कोणताच पुरावा नाही. त्यामुळे सर्व आरोपींना कोर्टाने निर्दोष मुक्त केले,