नाशिक

मालेगावला वर्षभरात अडीच कोटींचा दंड वसूल

आरटीओची कारवाई; दुचाकीस्वारांकडून सव्वातीन लाख

मालेगाव : प्रतिनिधी
येथील उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) विभागाने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनचालकांविरोधात विशेष मोहीम राबवली. गेल्या वर्षभरात विविध कारवायांतून सुमारे दोन कोटी 49 लाखांचा दंड वसूल केला आहे. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई करूनही काही वाहनचालकांमधील बेशिस्तपणा अद्याप कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे.
मालेगाव उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यक्षेत्रात मालेगाव, बागलाण, देवळा, कळवण आणि नांदगाव या पाच तालुक्यांचा समावेश आहे. या सर्व तालुक्यांमध्ये वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, तसेच वाहनचालकांनी सुरक्षितपणे वाहन चालवावे, यासाठी विभागाकडून नियमितपणे जनजागृती मोहीमही राबविण्यात येते, तरीही अनेक वाहनचालक नियमांकडे दुर्लक्ष करून वाहन चालवत असल्याचे कारवाईदरम्यान आढळून आले आहे.
आरटीओ विभागाने विनाहेल्मेट दुचाकी प्रवास, मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालविणे, नियमबाह्य वाहतूक व इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍यांविरोधात कारवाईचा बडगा उचलला आहे. या मोहिमेत गेल्या वर्षभरात एक हजार 518 अवजड वाहनांवर नियमभंग केल्याप्रकरणी कारवाई केली. त्यातून मोठ्या प्रमाणात दंड वसूल केला आहे.
राज्यात दुचाकीस्वारांसाठी हेल्मेटसक्तीचा नियम लागू करण्यात आला असला तरी अनेक जण या नियमाकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसते. उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कारवाईत चार हजार दुचाकीस्वार आढळून आले. यात दोन हजार 276 स्वार, तसेच दुचाकीवर मागे बसलेल्या 77 विनाहेल्मेट प्रवाशांचा समावेश आहे. या सर्वांकडून सुमारे सव्वातीन लाख रुपयांच्या आसपास दंड वसूल करण्यात आला आहे. नियमभंग करणार्‍यांविरोधातील ही कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले आहे.

दंड भरण्यासाठी ई-चलन पद्धत
वाहतूक विभागाने काळानुरूप तांत्रिक सुविधा उपलब्ध करून देत
ई-चलन ही ऑनलाइन पद्धत सुरू केली आहे. या प्रणालीमुळे नियमभंग करणार्‍या वाहनचालकांना त्यांच्या मोबाइलवर थेट दंडाची नोटीस पाठविण्यात येते. दंड भरण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध असल्याने वाहनचालकांना सोय झाली आहे. सध्या दंडात्मक कारवाई झालेल्या वाहनचालकांपैकी 20 ते 25 टक्के वाहनचालक ऑनलाइन पद्धतीने दंड भरत आहेत, अशी माहिती विभागाकडून देण्यात आली.

 

 

 

Malegaon collects fine of Rs 2.5 crore in a year

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

6 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

6 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

7 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

7 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

7 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

7 hours ago