मालेगाव हादरले; माजी महापौरांवर गोळीबार

मालेगावच्या एमआयएमच्या माजी महापौरावर गोळीबार

अब्दूल मलिक गंभीर जखमी

मालेगाव : आमिन शेख

– मालेगावमध्ये गोळीबाराच्या घटना सुरूच आहे. पुन्हा एकदा मालेगाव गोळीबाराच्या घटनेनं हादरलं आहे. एमआयएमच्या माजी महापौरांवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. एमआयएमचे माजी महापौर अब्दुल मलिक यांच्यावर अज्ञात व्यक्तीनं गोळीबार केला आहे. या घटनेत ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तीन गोळ्या लागल्या आहेत. एक हातावर, एक पायावर आणि एक गोळी छातीला लागली आहे. या घटनेनंतर मालेगावमध्ये तणावाचं वातावरण असून, पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, एमआयएमचे माजी महापौर अब्दुल मलिक यांच्यावर अज्ञात व्यक्तीनं गोळीबार केला आहे. या घटनेत त्यांना तीन गोळ्या लागल्या. एक हातावर, एक पायावर आणि एक गोळी छातीला लागली आहे. या घटनेत ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर मालेगावमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नाशिकला हलवण्यात आलं आहे. या घटनेनंतर मालेगावात तणावाचं वातावरण असून, पोलिस बंदोबस्ततात मोठी वाढ करण्यात आली आहे. गोळीबाराचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये, घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

– मालेगाव हे सर्वच बाबतीत हॉटस्पॉट ठरत आहे कालच मालेगाव येथे पेट्रोलपंपावर दरोडा घालण्यासाठी आलेल्या दोन तरुणांनी गावठी कट्ट्याने गोळीबार केला होता या घटनेला 24 तास उलटत नाही तोच आज पुन्हा गोळीबार करण्यात आला आहे यामुळे मालेगावात वातावरण तापले असून या घटनेची गंभीर दखल पोलिसांनी घ्यावी व शहरात कॉम्बिग ऑपरेशन करावे अशी मागणी होत आहे.

Bhagwat Udavant

Recent Posts

कसबेसुकेनेत बिबट्या जेरबंद

कसबे सुकेणे येथील तिडके वस्तीवर जेरबंद झाला बिबट्या कसबेसुकेणे: येथील दशरथ पोपट तिडके यांच्या शेत…

1 day ago

सातपूरला ज्योती स्ट्रक्चर कंपनीला आग

सातपूर: प्रतिनिधी सातपूर एमआयडीसीतील ज्योतीस्ट्रक्चर कंपनीला आज दुपारच्या सुमारास आग लागली . या  आगीचे कारण…

2 days ago

लासलगावी कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक ; कांद्याचे लिलाव पाडले बंद

लासलगावी कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक ; कांद्याचे लिलाव पाडले बंद लासलगाव:-समीर पठाण केंद्र सरकारने कांद्यावरील…

3 days ago

जीएम साहेब येता दारी तोच दिवाळी दसरा

मनमाड : प्रतिनिधी मराठीत एक म्हण आहे साधु संत येता दारी तोच दसरा दिवाळी ती…

3 days ago

ऑनर किलींग रोखण्यासाठी आता हेल्पलाईन तर गेस्ट हाऊस होणार सेफ होम !

ऑनर किलींग रोखण्यासाठी आता हेल्पलाईन तर गेस्ट हाऊस होणार सेफ होम ! निर्णयाचे अंनिस कडून…

3 days ago

पारा ५.७ अंशांवर स्थिर ,द्राक्षबागायतदार अस्थिर!

पारा ५.७ अंशावर स्थिर ,द्राक्षबागायतदार अस्थिर! निफाड :  प्रतिनिधी शहरासह तालुक्यात थंडीने मुक्काम. वाढविला आहे…

5 days ago