पालकमंत्री दादा भुसे यांच्या पॅनल ला धक्का
सोसायटी गटाच्या ११ पैकी १० जागांवर डॉ. हिरेंच्या पॅनल विजयी
मालेगाव: प्रतिनिधी
शिवसेना उपनेते डॉ.अद्वय आबा हिरे यांच्या नेतृत्त्वाखालील कर्मवीर भाऊसाहेब हिरे पॅनलने ११ पैकी १० जागांवर विजय मिळवला आहे. तर पालकमंत्री दादा भुसे यांच्या आपलं पॅनल ला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. उर्वरित ७ जागेंची मतमोजणी थोड्या वेळाने सूरू होणार आहे.सोसायटी गटाच्या अकरा पैकी दहा जागांवर डॉ. हिरेंचा पॅनल बाजी मारल्याने; पालकमंत्री भुसे यांच्या पॅनल ला धक्का पोहचण्याची चिन्हे आहेत.
मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती
सोसायटी सर्वसाधरण गट: ७ जागा
विजयी उमेदवार पुढील प्रमाणे
१) डॉ. अद्वयआबा प्रशांत हिरे (९६३)
२) विनोद गुलाबराव चव्हाण (९५१)
३) उज्जन निंबा इंगळे (८७०)
४) संदीप अशोक पवार ( ८१४)
५) सुभाष भिला सूर्यवंशी ( ८०९)
६) रवींद्र गोरख मोरे ( ८०२)
७) राजेंद्र तुकाराम पवार (८०१)
सोसायटी महीला राखीव
१) मीनाक्षी अनिल देवरे (९७९)
२) भारती विनोद बोरसे (८८३)
सोसायटी इमाप्र राखीव
१) चंद्रकांत धर्मा शेवाळे ( ८५४)
सोसायटी भ.वि.जा जाती
१) नंदलाल दशरथ शिरोळे (९२८)