मुंबई :
प्रवाशांच्या सुरक्षिततेला
सर्वोच्च प्राधान्य देण्यासाठी आणि सेवेदरम्यान मद्यपानाच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) आता सर्व चालकांसाठी दररोज ‘अल्कोटेस्ट’ बंधनकारक केली आहे. परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार, आगारात कामावर हजर होणार्या प्रत्येक चालकाची मशीनद्वारे तपासणी करून व त्याची रीतसर नोंद घेऊनच त्यांना कर्तव्यावर पाठवण्यात येणार आहे, ज्यामुळे एसटीचा प्रवास अधिक सुरक्षित होण्यास मदत होईल.
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी 25 जानेवारी रोजी मुंबईतील परळ बसस्थानकाची अचानक पाहणी केली असता, चालक-वाहकांच्या विश्रांतीगृहामध्ये मद्याच्या बाटल्या आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या भेटीदरम्यान काही कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत असल्याचेही निदर्शनासआले, ज्यामुळे एसटी प्रशासनातील शिस्तीचा आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.या प्रकरणाची गंभीर दखल घेत मंत्री सरनाईक यांनी तातडीने चौकशी समिती नेमण्याचे आदेश दिले असून, या गैरप्रकाराला जबाबदार असणार्या संबंधित अधिकार्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आणि कर्मचार्यांवर वचक बसवण्यासाठी प्रशासनाने कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना अंमलात आणाव्यात, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.परळ बसस्थानकातील घटनेच्या पार्श्वभूमीवर एसटी प्रशासनाने तीन अधिकार्यांची समिती नेमून या प्रकरणाची सखोल चौकशी पूर्ण केली आहे. या चौकशीत दोषी आढळलेल्या अधिकार्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली असून, अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी समितीने काही महत्त्वपूर्ण आणि ठोस उपाययोजनाही सुचवल्या आहेत.
Mandatory breathalyzer testing of bus drivers and conductors
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…