लासलगाव : प्रतिनिधी
देवगाव येथील देवगाव ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे मॅनेजर राजेंद्र विश्वनाथ गुरव यांनी एक एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 व एक एप्रिल 2021 ते 31 मार्च 2023 या कालावधीत पतसंस्थेच्या सभासदांच्या जमा रक्कम आयडीबीआय बँकेच्या शाखेत जमा असलेले 35 लाख 78 हजार 43 रुपये इतकी रक्कम लासलगाव येथील आयडीबीआय बँकेच्या पतसंस्थेच्या खात्यातील रक्कम बनावट चेक द्वारे आणि रोख स्वरूपात काढून पतसंस्थेत आर्थिक हिशोब देऊन स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी या रक्कमेचा वापर केला व पतसंस्थेची आर्थिक फसवणूक केली म्हणून शासनाचे लेखापरीक्षक सुनील चंद्रकांत जडे यांच्या फिर्यादी वरून लासलगाव पोलीस कार्यालयात पुन्हा दाखल झाला आहे
शासकीय लेखापरीक्षक सुनील जडे यांच्या फिर्यादीवरून लासलगाव पोलीस कार्यालयात भा.द.वी कायदा कलम. ४२०, ४६५, ४६८, ४७१, ४७७ (अ), ४०६ प्रमाणे पतसंस्थेचे मॅनेजर विश्वनाथ गुरव रा.आशियाना को. ऑप. हौ. सोसायटी,बी.विंग, बी. बिल्डींग फ्लॅट नं. ४०२ नानावली, द्वारका नाशिक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दि.०१ एप्रिल २०२१ ते दि.३१ डिसेंबर २०२२ व दि.०१ एप्रिल २०२२ ते दि.३१ मार्च २०२३ रोजी पावेतो देवगाव ग्रामिण बिगरशेती सहा. पतसंस्था मर्या.देवगाव ता.निफाड जि.नाशिक या संस्थेचे कार्यालयात देवगाव येथे राजेंद्र गुरव यांनी अधिकृत संस्थेच्या मॅनेजर पदावर असतांना पतसंस्थेच्या विवीध सभासद लोकांचे जमा असलेले रक्कम आय.डी.बी.आय बँकेतुन बनावट चेकद्वारे तसेच रोख स्वरुपात असा एकुण ३५,७८,०४३.००रुपयाची रक्कम परस्पर संस्थेचा विश्वासघात करुन बनावटी करुन अपहार करुन स्वताच्या आर्थिक फायद्यासाठी खोटा दस्तावेज तयार करुन संस्थेस खोटा हिशोब देवुन संस्थेची आर्थिक फसवणुक करुन संस्थेस बनावट दस्तावेज खरा म्हणुन भासवुन संस्थेची फसवणुक केली म्हणुन गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास लासलगाव चे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पो.उप.निरी.वाळके करत आहे.