मुंबई: विधानसभेत रमी खेळत असल्याच्या मुद्द्यावरून जोरदार टीका झाल्यामुळे चर्चेत आलेले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला मंत्रालयात गेले आहे. अँटी चेंबरमध्ये कोकाटे आणि अजितदादा यांच्यात सद्या चर्चा सुरू आहे. वारंवार आपल्या विधानाने कोकाटे वादाच्या भोवऱ्यात सापडत आहेत, सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर अजित पवार यांनी कोकाटे यांना आज भेटीला बोलावले होते. यात नेमके काय होते याकडे लक्ष लागले आहे.